दुचाकीचोर गजाआड, चोरीच्या दोन गाड्या जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 00:41 IST2018-06-08T00:41:35+5:302018-06-08T00:41:35+5:30

दुचाकी चोरी करणाऱ्या एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्या ताब्यातून साठ हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

Two stolen Two-wheelers seized | दुचाकीचोर गजाआड, चोरीच्या दोन गाड्या जप्त

दुचाकीचोर गजाआड, चोरीच्या दोन गाड्या जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : दुचाकी चोरी करणाऱ्या एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्या ताब्यातून साठ हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. विशेष कृती दलाने गुरुवारी ही कारवाई केली.
शहरातील ओम हॉस्पिटल व औद्योगिक वसाहतीमधून काही दिवसांपूर्वी दोन दुचाकी चोरीस गेल्या होत्या. या दुचाकी चोरणारा संशयित तारासिंग दुर्गासिंग कलाणी (रा. गुरुगोविंदसिंगनगर,जालना) हा एका दुचाकीसह एका शाळेच्या मैदानात उभा असल्याची माहिती विशेष कृती दलाचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांना मिळाली. त्यानुसार विशेष कृती दलाच्या पथकाने त्यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने वरील दोन्ही ठिकाणांहून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. चोरलेल्या ६० हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. संशयिताविरुद्ध सदर बाजार व चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कृती दलाचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, कर्मचारी एम. बी. स्कॉट, फुलचंद हजारे, श्रीकुमार आडेप, सचिन आर्य यांनी ही कारवाई केली.

Web Title: Two stolen Two-wheelers seized