औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय मार्गावर कंटेनर आणि कारच्या धडकेत दोघे गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 16:04 IST2019-01-31T16:03:26+5:302019-01-31T16:04:04+5:30
अपघात घडल्यानंतर जखमींना मदत न करता कंटेनर चालकाने गाडीसोडून घटनस्थळावरुन पळ काढला.

औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय मार्गावर कंटेनर आणि कारच्या धडकेत दोघे गंभीर जखमी
अंकुशनगर (जालना ) : औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील महाकाळा फाट्याजवळ कंटेनर आणि कारचाअपघातात दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली.
औरंगाबादहून उस्मानाबादकडे जाणारी कार (क्रमांक एम. एच. २० डी. एफ. १२५१) व बीडहून औरंगाबादकडे भरधाव येत असलेला कंटेनर ( क्रमांक एच. आर. ६५ ए. ७२०१) औरंगाबाद- सोलापूर महामार्गावरील महाकाळा फाट्यावरील वळण रस्त्यावर समोरासमोर धडक झाली. या अपघातात इंडिका गाडीतील निशा मनोज पाटील ( २५) व राणी संतोष बोराडे (२७) या दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. तर प्रमिला शहाजी पाटील ( ६७), हर्षवर्धन मनोज पाटील ( १०), श्रावणी मनोज पाटील (७), सोनल संतोष बोराडे (६) जखमी आहेत. अपघाताचा मोठा आवाज झाल्याने महाकाळा येथील नागरिक, वाहनधारकांनी तातडीने जखमींना वडीगोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर जखमींना औरंगाबाद येथे उपचाराठी पाठविण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. आणि कंटनेर जप्त केला.
कंटेनर चालक फरार
अपघात घडल्यानंतर जखमींना मदत न करता कंटेनर चालकाने गाडीसोडून घटनस्थळावरुन पळ काढला. वळण रस्ता असतांना जड वाहनधारक सुसाट वाहने चालवत असल्याने अपघात होत असल्याने महाकाळा येथील ग्रामस्थांनी सांगितले.