जालन्यात महिलेकडून सव्वा दोन लाखांचा गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 17:12 IST2019-02-01T17:09:29+5:302019-02-01T17:12:14+5:30

तालुक्यातील खरपूडी येथून एका महिलेच्या घरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने साडेचार किलो गांजा जप्त केला असून, महिलेला ताब्यात घेण्यात आले.

two lakhs and 25 thousands Ganja seized from a woman in Jalana | जालन्यात महिलेकडून सव्वा दोन लाखांचा गांजा जप्त

जालन्यात महिलेकडून सव्वा दोन लाखांचा गांजा जप्त

जालना : तालुक्यातील खरपूडी येथून एका महिलेच्या घरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने साडेचार किलो गांजा जप्त केला असून, महिलेला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास करण्यात आली. 

स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. राजेंद्रसिंह गौर यांना खबऱ्यामार्फेत माहिती मिळाली की, खरपूडी येथील एक महिला गांजाची विक्री करीत आहे. या माहितीवरून पोलिसांनी सदर ठिकाणी छापा मारला असता, येथे साडेचार किंलो गांजा मिळून आला. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले असून, तिच्याकडून सव्वा दोन लाखांचा गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई  पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. राजेंद्रसिंह गौर, कर्मचारी टी. सी. राठोड, सदाशिव राठोड, हरिश राठोड, कांयदे, रजिंद वैराळ, समाधान, वैभव खोकले आदींनी केली.

Web Title: two lakhs and 25 thousands Ganja seized from a woman in Jalana