दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 01:36 IST2020-01-10T01:36:10+5:302020-01-10T01:36:22+5:30

जालना- राजूर मार्गावरील तुपेवाडी शिवारात बुधवारी रात्री झालेल्या दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू झाला.

Two killed in a two-wheeler accident | दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू

दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
मानदेऊळगाव : जालना- राजूर मार्गावरील तुपेवाडी शिवारात बुधवारी रात्री झालेल्या दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू झाला. विठ्ठल ज्ञानेश्वर हळदे (३६ रा. बन्डूजी धोत्रा ता.चिखली) व भीमराव जिजा जाधव (४० रा. तुपेवाडी ता. बदनापूर) अशी मयतांची नावे आहेत. तुपेवाडी येथील बंडूनाईक आश्रमशाळेत हळदे शिक्षक म्हणून कार्यरत होते. बुधवारी रात्रीच्या सुमारास हळदे डबा आणण्यासाठी राजूर येथे गेले होते. डबा घेऊन परत येत असताना वाटेत भीमराव जाधव भेटले. जाधव यांना घेऊन निघाल्यानंतर दुचाकीला अपघात झाला. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले. जालन्यातील रूग्णालयात जाधव यांना मयत घोषित करण्यात आले. तर हळदे यांची औरंगाबाद येथील रूग्णालयात प्राणज्योत मालवली.

Web Title: Two killed in a two-wheeler accident