दुचाकींची समोरासमोर धडक, दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 00:44 IST2018-05-08T00:44:19+5:302018-05-08T00:44:19+5:30
भरधाव दोन दुचाकींची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात दोघांचा जागेवर मृत्यू झाला

दुचाकींची समोरासमोर धडक, दोन ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबड : भरधाव दोन दुचाकींची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात दोघांचा जागेवर मृत्यू झाला. जालना-बीड मार्गावरील रामनगर तांडा (ता.अंबड) फाट्यावर सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.
बापू दादाराव खंडागळे (३५,रा. बेलगाव, ता. गेवराई.जि.बीड) व वैष्णवी विष्णू मिठे (६, रा.धनगरपिंप्री) असे मृतांची नावे आहेत.
बापू खंंडागळे हे अंबडकडून लग्नाच्या कार्यक्रमाहून बेलगावकडे जात होते. याच वेळी ढाकलगाव (ता. अंबड ) येथील विष्णू सव्वाशे हे पत्नी व साडूची मुलगी वैष्णवी यांना घेवून दुचाकीने अंबडकडे येत होते. दोन्ही दुचाकींची रामनगरतांडा फाट्यावर समोरासमोर धडक झाली. यात वरील दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. तर विष्णू सव्वाशे व त्यांची पत्नी गंभीर जखमी झाले. माहिती मिळताच बीट जमादार जे. पी. पिल्ले यांनी घटनास्थी पोहचून जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलविले. त्यानंतर वाहतूक सुरळीत करत मृतदेह उत्तरीय तपासणीठी अंबड रुग्णालयात पाठवले.
जखमी पती-पत्नीवर जालन्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत अंबड पोलीस ठाण्यात कुठलीही नोंद नव्हती.