इंदेवाडी पंपावर डिझेल भरताना ट्रकला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 00:36 IST2019-02-15T00:36:05+5:302019-02-15T00:36:52+5:30

इंदेवाडी येथील शंतनू पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी उभ्या असलेल्या ट्रकच्या समोरच्या भागास अचानक आग लागल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली.

Truck burns when filling diesel at Indivewadi Pumps | इंदेवाडी पंपावर डिझेल भरताना ट्रकला आग

इंदेवाडी पंपावर डिझेल भरताना ट्रकला आग

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : इंदेवाडी येथील शंतनू पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी उभ्या असलेल्या ट्रकच्या समोरच्या भागास अचानक आग लागल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली.
अंबड मार्गावर असलेल्या इंदेवाडी येथील शंतनू पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी गेलेल्या ट्रकला डिझेल भरत असतांना समोरच्या भागामध्ये अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली.
परिसरात नाकाबंदी करत असलेल्या तालुका जालना पोलिसांनी घटनेचे गंभीरता ओळखून घटनास्थळी धाव घेऊन पेंट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांसह अग्निशमन दलाच्या बंबाव्दारे आगीवर नियंत्रण मिळविले. तसेच पुढील अनर्थ टाळण्यायसाठी ट्रकला तातडीने पेट्रोलपंपासून दूर नेण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिकांनीही मदत केली.

Web Title: Truck burns when filling diesel at Indivewadi Pumps