जालना जिल्ह्यात तलावात बुडून तीन मुलींचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2018 17:09 IST2018-05-20T17:09:40+5:302018-05-20T17:09:40+5:30

लघु तलावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या 6 मुली पैकी 3 जणींचा बुडून मृत्यू झाला तर 3 वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले. ही दुर्घटना आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली.

Three girls die drowning in a lake | जालना जिल्ह्यात तलावात बुडून तीन मुलींचा मृत्यू

जालना जिल्ह्यात तलावात बुडून तीन मुलींचा मृत्यू

जालना - लघु तलावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या 6 मुली पैकी 3 जणींचा बुडून मृत्यू झाला तर 3 वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले. ही दुर्घटना आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली.  कपडे  धुतल्यानंतर सहाही जणी पोहण्यासाठी तलावात उतरल्या पण पाण्याचा अंदाज न आल्याने  गटांगळ्या खाऊन सुमित्रा दत्तात्र्यय सातपुते (16). संगीता बजरंग रनमळे (22). जना भानुदास रनमळे (13). या तीघीचा बुडून मृत्यू झाला. कल्याणी मधुकर खोसे (16). मनीषा भानुदास रनमळे (13). ज्योती अशोक हेमके (11). यांना  वाचवण्यात यश आले.

मच्छिन्नद्रनाथ चिंचोली गावातील 6 मुली आज सकाळच्या सुमारास गावच्या परिसरातील तलावामध्ये कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धुवून झाल्यानंतर या सहाही मुली पोहण्यासाठी तलावात उतरल्या. मात्र यातील एक मुलगी बुडत असल्याचे लक्षात आल्यानंतर चौघींनी तिला वाचवण्यासाठी तिच्या दिशेने जायला सुरुवात केली. पण तलावात पाणी मोठ्या प्रमाणात असल्यानं तिला वाचवताना तिघींचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.

Web Title: Three girls die drowning in a lake