शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

जलना शहरातील ४० सीसीटीव्ही कॅमेरे ‘डॅमेज’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 12:21 AM

देखभाल दुरूस्ती अभावी यातील ४० हून अधिक कॅमेरे डॅमेज झाले असून, पोलीस मुख्यालयाशी असलेली कनेक्टिव्हिटीही बंद पडली आहे.

ठळक मुद्देकनेक्टिव्हिटी बंद : शहरातील मुख्य ठिकाणच्या हालचाली होईनात कॅमेऱ्यात कैद

जलना : शहरातील वाढत्या चोऱ्यांना लगाम लागावा, मुख्य चौकासह बाजारपेठेतील हलचालींवर नजर रहावी, यासाठी २०१४ मध्ये जवळपास ४४ लाख रूपये खर्च करून शहरातील विविध भागात ७० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होेते. मात्र, देखभाल दुरूस्ती अभावी यातील ४० हून अधिक कॅमेरे डॅमेज झाले असून, पोलीस मुख्यालयाशी असलेली कनेक्टिव्हिटीही बंद पडली आहे.जालना शहरासह परिसरात वाढलेल्या चो-या रोखणे, मुख्य बाजारपेठ, मुख्य चौकातील हलचालींवर नजर ठेवण्यासाठी जालना शहरात सन १०१४ मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत ४४ लाख रूपये निधी खर्च करून ३५ ठिकाणी ७० कॅमेरे बसविण्यात आले होते. त्यामुळे या कॅमे-यांच्या कक्षेत येणाºया हलचालींवर पोलीस दलाच्या वतीने बारकाईने नजर ठेवली जात होती. शिवाय एखादी चोरीची घटना असो किंवा कॅमेºयाच्या समोर होणाºया हाणामारी, कायद्याचे उल्लंघन होणाºया बाबी असोत यावर मोठा चाप बसला होता.मात्र नंतरच्या काळात या सीसीटीव्ही कॅमेºयाच्या देखभाल दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाले. शिवाय पोलीस दल आणि पालिकेतील समन्वयाच्या अभावामुळे काही कॅमेरे बंद अवस्थेत आहेत.मध्यंतरीच्या गणेशोत्सव, दस-याच्या कालावधीत काही ठिकाणचे कॅमेरे पालिकेच्या वतीने दुरूस्त करून पोलीस नियंत्रण कक्षातील कनेक्टिव्हीटी सुरू करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा ही कनेक्टिव्हीटी बंद पडली आहे. शहर व परिसरात होणारी वाहन चोरी, शहरातील घटनाघडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे सुरू राहणे गरजेचे आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने सीसीटीव्हींची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.....तर पोलिसांना मिळतील पुरावेजालना शहरात होणारी वाहन चोरी, घरफोड्या, दुकानातील चोरीसह मुख्य चौकात, बाजारपेठेत अनेक गुन्हेगारी कृत्य घडतात. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असतील तर पोलिसांना तपासात पुराव्याच्या दृष्टीने मोठी मदत होणार आहे. शिवाय कॅमेºयांची नजर असेल अनेक घटनांना लगाम लागणार आहे.

टॅग्स :Jalanaजालनाcctvसीसीटीव्हीPoliceपोलिस