७६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 00:59 IST2019-07-31T00:59:04+5:302019-07-31T00:59:22+5:30

घरात कोणी नसल्याच्या संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्या चांदीच्या दागिन्यांसह ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना सोमवारी रात्री जालना शहरातील पेन्शनपुरा येथे घडली.

Thousands of rupees worth Rs | ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास

७६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : घरात कोणी नसल्याच्या संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्या चांदीच्या दागिन्यांसह ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना सोमवारी रात्री जालना शहरातील पेन्शनपुरा येथे घडली.
पेन्शनपुरा येथील मोहम्मद अजीज मोहम्मद शकील हे घर गळत असल्याने घराला कुलूप लावून कुटुंबासह समोरील भाड्याच्या घरात झोपण्यासाठी गेले होते. याच संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी घराच्या दरवाज्याचा कडीकोंडा तोडून कपाटामध्ये ठेवलेली रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने लंपास केले.
दरम्यान, मंगळवारी सकाळी मोहम्मद अजीज मोहम्मद शकील हे उठल्यावर त्यांना घरात चोरी झाल्याचे कळाले. त्यानंतर त्याची माहिती पोलिसांना दिली. त्यांच्या घरातून रोख रक्कमेसह सोन्या चांदीचे दागिने, असा ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.
याप्रकरणी मोहम्मद अजीज मोहम्मद शकील (२५) यांच्या फिर्यादीवरुन सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ पवार करीत आहेत.

Web Title: Thousands of rupees worth Rs