वडीगोद्री परिसरात चोरट्यांचा धुमाकुळ; एकाच रात्री सहा ठिकाणी चोरीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 18:57 IST2018-10-31T18:56:43+5:302018-10-31T18:57:03+5:30

अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे मंगळवारी रात्री  चोरट्यांनी धुमाकुळ घातला.

The thieves in the Vadigodri area; Try to steal at six places in one night | वडीगोद्री परिसरात चोरट्यांचा धुमाकुळ; एकाच रात्री सहा ठिकाणी चोरीचा प्रयत्न

वडीगोद्री परिसरात चोरट्यांचा धुमाकुळ; एकाच रात्री सहा ठिकाणी चोरीचा प्रयत्न

वडीगोद्री (जालना ) : अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे मंगळवारी रात्री  चोरट्यांनी धुमाकुळ घातला. एकाच वेळी सहा घराचे दरवाजे तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी एका घरातील रोख रक्कम व सोन्याचा ऐवज चोरुन नेण्यास चोरटे यशस्वी झाले. गेल्या तीन महिन्यात परिसरात घरफोडीच्या घटना वाढल्याने नागरिकात दहशतीचे वातावरण आहे. 

मंगळवारी रात्री वडीगोद्री येथे चोरट्यांनी धुमाकुळ घालत एकाच रात्री  विनोद साहेबराव पिंगळे, बाबासाहेब सर्जेराव काळे , संतोष फटाले, नंदू फटाले यांच्या घराचे कुलुप तोडून चोरीचा प्रयत्न केला. त्यानंतर चोरट्यांनी राधाकिसन काळे यांच्या घराच्या मागील दरवाज्याची कडी उघडून घरात प्रवेश केला. यानंतर कपाटातून एक सोन्याची पोत आणि सहा हजार रुपये असा तीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. वाढत्या चोरीच्या घटनाकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.

Web Title: The thieves in the Vadigodri area; Try to steal at six places in one night