आष्टीत चोरांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 00:38 IST2018-11-27T00:38:24+5:302018-11-27T00:38:54+5:30

परतूर तालुक्यातील आष्टी येथे एकापाठोपाठ चोरीच्या घटना घडत असुन रविवारी सकाळी तीनच्या सुमारास चोरांनी गजानन कॉलनी तसेच सावतानगर या भागात धुमाकूळ घातला.

Thieves nuisence in Ashti | आष्टीत चोरांचा धुमाकूळ

आष्टीत चोरांचा धुमाकूळ

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी येथे एकापाठोपाठ चोरीच्या घटना घडत असुन रविवारी सकाळी तीनच्या सुमारास चोरांनी गजानन कॉलनी तसेच सावतानगर या भागात धुमाकूळ घातला.
आष्टीच्या मोंढा भागातील गजानन कॉलनीमधे चोरांनी पंडित काटे , भागवत जगताप , सीताराम खरात आणि राम सोळंके यांच्या घराचे गेट व आतील कुलूप लोखंडी टॉमीच्या साह्याने तोडून आत प्रवेश केला. काटे यांच्या कपाटातील सामान अस्ताव्यस्त केले परंतु तिथे काहीही न मिळाल्याने, चोरांनी आपला मोर्चा वामन साठे यांच्या घराकडे वळवला. साठे यांच्या घरातील कपाटातून सोन्याचे गंठण, कानातील वेल व नगदी असा एकूण चाळीस हजाराचा मुद्देमाल घेऊन चोरांनी सावतानगर गाठले.
सावतानगर मधील लक्ष्मीबाई बादाडे यांच्या घरी चोरीचा प्रयत्न असफल झाल्याने चोरांनी रावसाहेब चव्व्हाण यांच्या घरात प्रवेश केला. तिथेही महिलांनी आरडाओरड केली त्यामुळे चोरांनी धूम ठोकली.
आष्टीमधे घडणाऱ्या अशा चोरीच्या घटनांमुळे आष्टी व परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. यावर पोलिस प्रशासनाने रात्रीच्या गस्तीमधे वाढ करून नागरिकांमधे निर्माण झालेली भीती दूर करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.यापूर्वी आष्टीत दरोड्यांचे सत्र सुरू होते.

Web Title: Thieves nuisence in Ashti