शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर बाळाचे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक
2
"तुला मिळणार नाही, मोठ्याला घेऊन ये"; पुण्यात अचानक दारु विक्रीचे 'नियम' लागू झाले
3
भीषण! इस्रायलने राफामध्ये केला एअर स्ट्राईक; 35 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
४ जूनला मतमोजणी, १ जूनला इंडिया आघाडीची मोठी बैठक; केजरीवाल, स्टॅलिन यांना निमंत्रण
5
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, Adani Portsच्या शेअरमध्ये तेजी, Wipro घसरला
7
"भारतात आजही सावरकरांचे विचार लागू..."; रणदीप हूडाने मनातली भावना स्पष्टच सांगितली
8
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
9
गुरु रंधावा-शहनाज गीलच्या डेटिंगचं सत्य आलं समोर; गायकाने केला खुलासा, म्हणाला, 'मी डेट करायला सुरुवात...'
10
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
11
जान्हवी कपूरने शेअर केला हिंदी मालिकेचा प्रोमो, ऋतुजा बागवेची आहे मुख्य भूमिका
12
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
13
JioCinema चा आणखी एक धमाका! अवाक् करणाऱ्या किंमतीत मिळणार प्रीमिअम ॲन्युअल प्लॅन, पाहा डिटेल्स
14
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
15
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
16
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
17
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
18
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
19
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
20
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही

मंठ्यात चोरटे आले अन् पळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2019 12:47 AM

चोरट्यांचा घरफोडीचा डाव मंठा पोलिसांनी उधळून लावत एका दुचाकीसह कार ताब्यात घेतली. पोलिसांनी पाठलाग केल्याने वाहने सोडून चोरट्यांनी शेतशिवारातून पळ काढला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : चोरट्यांचा घरफोडीचा डाव मंठा पोलिसांनी उधळून लावत एका दुचाकीसह कार ताब्यात घेतली. पोलिसांनी पाठलाग केल्याने वाहने सोडून चोरट्यांनी शेतशिवारातून पळ काढला. ही घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली असून, या प्रकरणी मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मंठा शहरातील तुकाराम नगर भागात रविवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी घरफोडीचा प्रयत्न केला. मात्र, गस्तीवर असलेल्या पोलिसांना चोरट्यांचा सुगावा लागला. पोनि विलास निकम व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोरट्यांचा पाठलाग सुरू केला. पोलीस पाठलाग करीत असल्याने चोरट्यांनी दुचाकीवरून व चारचाकी वाहनातून मंठा टी पॉइंट, जिंतूर रोड ते तळणी मार्गापर्यंत पळ काढला. मात्र, पोलीस पाठलाग करीत असल्याने निळकंठेश्वर मंदिराजवळ वाहने सोडून चोरट्यांनी शेतशिवारातून पळ काढला. पोलिसांनी एका विना नंबरच्या कारसह एक दुचाकी (क्र. एम.एच.२८- ए.एच.२७७३) ताब्यात घेतले. या प्रकरणी चोरट्यांविरूध्द मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :ThiefचोरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस