दगडी कोळसा घेऊन जाणारा ट्रक विद्युत खांबाला धडकला;चालकाने वेळीच उडी घेतली अन्यथा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 18:04 IST2022-04-01T18:03:43+5:302022-04-01T18:04:16+5:30
जालना औद्योगिक वसाहतीजवळ आल्यावर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले

दगडी कोळसा घेऊन जाणारा ट्रक विद्युत खांबाला धडकला;चालकाने वेळीच उडी घेतली अन्यथा...
सेलगाव ( जालना ) : दगडी कोळसा घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकाचे नियंत्रण सुटून ट्रक विद्युत खांबावर धडकून आग लागल्याची घटना जालना शहरातील औद्योगिक वसाहतीजवळ शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने विद्युत तारा तुटण्याआधीच चालकाने प्रसंगावधान राखत ट्रकमधून उडी टाकली. यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.
बदनापूर तालुक्यातील खादगाव येथील एका कंपनीमधून दगडी कोळशाने भरलेला ट्रक (एमएच.२०.डीई.४९९५) हा शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास जालन्याकडे जात होता. जालना औद्योगिक वसाहतीजवळ आल्यावर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले अन् ट्रक रस्त्याच्याजवळ असलेल्या विद्युत खांबाला धडकला अन् तार तुटून पडल्याने ट्रकने पेट घेतला. सुदैवाने तार तुटण्याआधीच चालकाने बाहेर उडी टाकल्याने कोणतीही जीवीतहानी झाली नाही. परिसरातील नागरिकांनी पाण्याचे टँकर आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला.