स्प्रे मारून व्यापाऱ्याला दीड लाखांना लुटले

By दिपक ढोले  | Updated: March 30, 2023 00:20 IST2023-03-30T00:19:53+5:302023-03-30T00:20:06+5:30

ही  घटना जालना शहरातील जालना-रोहनवाडी रोडवरील बर्डी महादेव मंदिर फाट्यावर बुधवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली.

The businessman was robbed of one and a half lakhs by spraying | स्प्रे मारून व्यापाऱ्याला दीड लाखांना लुटले

स्प्रे मारून व्यापाऱ्याला दीड लाखांना लुटले

जालना : पेट्रोल पंपावर जमा झालेली रक्कम बँकेत भरण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या व्यापाऱ्याच्या तोंडावर स्प्रे मारून १ लाख ६५ हजार रूपये लांबविले. ही  घटना जालना शहरातील जालना-रोहनवाडी रोडवरील बर्डी महादेव मंदिर फाट्यावर बुधवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली.
 
रूपनगर येथील रहिवासी अशोक भिकाजी चव्हाण यांचा लोंढेवाडी येथे सारथी नावाचा पेट्रोल पंप आहे. बुधवारी दिवसभर पेट्रोल पंपावर जमा झालेले १ लाख ६५ हजार रूपये घेऊन अशोक चव्हाण हे दुचाकीने जालना येथील बँकेकडे येत होते. जालना ते रोहणवाडी रस्त्यावरील बर्डी महादेव मंदिर फाट्याजवळ आल्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अशोक चव्हाण यांच्या तोंडावर स्प्रे मारला.  नंतर त्यांच्याकडे असलेले १ लाख ६५ हजार रूपये हिसकावून नेले. याची माहिती तातडीने तालुका पोलिसांना देण्यात आली. तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रमेश जायभाये हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास पोलिस  करीत आहेत. या प्रकरणी  अशोक  चव्हाण यांच्या फिर्यादीवरून संशयितांविरुद्ध तालुका ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The businessman was robbed of one and a half lakhs by spraying