उद्धव ठाकरे साधणार शेतकऱ्यांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 00:40 IST2019-01-08T00:40:05+5:302019-01-08T00:40:14+5:30
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मराठवाड्याच्या दौ-यावर ९ जानेवारी रोजी येणार आहेत.

उद्धव ठाकरे साधणार शेतकऱ्यांशी संवाद
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मराठवाड्याच्या दौ-यावर ९ जानेवारी रोजी येणार असून बीड येथील सभा आटोपून ते औरंगाबादकडे जाताना जालना येथेही शेतकºयांशी संवाद साधणार आहेत.
जालना येथे दुपारी २ वाजता अंबड चौफुलीवरील मातोश्री लॉन्स व त्यानंतर बदनापूर येथे दुपारी ३ वाजता चाणक्य मंगल कार्यालयात शेतक-यांशी संवाद साधणार आहेत. ७ जानेवारी रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे.बोराडे यांनी जिल्हा कार्यकारिणी व प्रमुख पदाधिका-यांची बैठक माजी आ. संतोष सांबरे यांच्या उपस्थितीत घेतली. यात ठाकरे यांच्या दौºयाच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर,ए.जे.बोराडे यांनी केले. बैठकीस उपजिल्हाप्रमुख राव साहेब राऊत, यादवराव राऊत, बबनराव खरात, संतोष मोहिते उपस्थित होते.