शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

नियमबाह्य वेतनवाढ घेणाऱ्यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:28 IST

देऊळगाव राजा : शासनाच्या सहाव्या वेतन आयोगातील मार्गदर्शक तत्त्वांची पायमल्ली करून नगरपालिकेच्या काही कर्मचाऱ्यांनी नियमबाह्य वेतनवाढ घेतल्याचा प्रकार समोर ...

देऊळगाव राजा : शासनाच्या सहाव्या वेतन आयोगातील मार्गदर्शक तत्त्वांची पायमल्ली करून नगरपालिकेच्या काही कर्मचाऱ्यांनी नियमबाह्य वेतनवाढ घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. या आदेशाची पायमल्ली करून शासनाची दिशाभूल करीत फसवणुकीसाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी चंद्रकांत खरात यांनी नगरपालिका आयुक्तांकडे केली आहे.

जिल्ह्यातील क वर्ग असलेल्या देऊळगाव राजा नगरपालिकेतील काही कर्मचाऱ्यांनी शासनाने जेव्हा सहावा वेतन आयोग लागू केला त्या आयोगाच्या शिफारशीमध्ये कोणत्याही कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढ देता येणार नाही, असा निर्णय घेतलेला होता. मात्र, या आदेशाची पायमल्ली करीत अनेक कर्मचाऱ्यांनी चुकीची माहिती नगरपालिका प्रशासनाला देऊन नियमबाह्य वेतनवाढ लागू करून घेत शासनाची फसवणूक केल्याची तक्रार चंद्रकांत ज्ञानदेव खरात यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे. देऊळगाव राजा नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून, उत्पन्नाचे स्रोतही मर्यादित आहेत. असे असताना पालिकेतील काही कर्मचाऱ्यांनी सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार चुकीची माहिती सादर करून शासनाच्या आदेशाची पायमल्ली केली आहे. त्यामुळे संबंधितांकडून एकरकमी रक्कम वसूल करून प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करावी तसेच त्यांना साहाय्य करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणीही खरात यांनी केली आहे.