संशयाने उद्ध्वस्त केला संसार; पत्नीसह मुलीची धारदार शस्त्राने वार करून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 15:24 IST2020-09-02T15:12:15+5:302020-09-02T15:24:05+5:30

दोघींची आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी तोडला दरवाजा

Suspicion destroyed the married world; Murder of wife and daughter with a sharp weapon | संशयाने उद्ध्वस्त केला संसार; पत्नीसह मुलीची धारदार शस्त्राने वार करून हत्या

संशयाने उद्ध्वस्त केला संसार; पत्नीसह मुलीची धारदार शस्त्राने वार करून हत्या

ठळक मुद्देरुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलेपती सह गावातील तिघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु

आष्टी (जालना) : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीसह मुलीचा धारधार शास्त्राने खून केला. ही घटना परतूर तालुक्यातील अकोली गावात बुधवारी ( दि. २ ) सकाळी आठ वाजेच्या दरम्यान घडली. ज्योती शहाजी देशमुख (२६) व ऋतुजा शहाजी देशमुख (०६) अशी मृतांची नावे आहेत.

अकोली गावातील शहाजी गोविंदराव देशमुख यांचा मागील वर्षभरापासून पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यामुळे पती- पत्नीत सतत भांडणे होत असत. बुधवारी सकाळी शहाजी यांनी घराला आतून कडी लावून पत्नीसह ६ वर्षाच्या मुलीवर धारधार शस्त्राने वार केले. दोघींची आरडाओरड शेजाऱ्यांना ऐकू आल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेत घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. यावेळी ज्योती व ऋतुजा रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळून आल्या. 

शेजाऱ्यांनी त्यांना आष्टी येथील प्राथमिक रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी तपासून दोघींनाही मयत घोषित केले. या प्रकरणी मृत महिलेचा भाऊ नागेश रूस्तूम सोळंके यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी शहाजी देशमुख यांच्यासह गावातील इतर तीन जणांवर गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपी शहाजी देशमुख पोलिसांच्या ताब्यात असून इतर तिघे फरार झाले आहेत. त्यांच्या शोधार्थ दोन पोलीस पथके रवाना झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी एस. डी. बांगर, सपोनि. एस. बी. सानप भेट दिली आहे.

Web Title: Suspicion destroyed the married world; Murder of wife and daughter with a sharp weapon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.