कडक निर्बंध व्यापाऱ्यांच्या मूळावर : निवेदनातून मांडल्या व्यथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:19 IST2021-07-05T04:19:19+5:302021-07-05T04:19:19+5:30
आधीच कोरोनाने व्यापार घटला असून, बँकांची कर्ज देणे थकली आहेत. कसेबसे नियम शिथिल झाल्यावर दुकाने उणीपुरी १९ दिवस सुरू ...

कडक निर्बंध व्यापाऱ्यांच्या मूळावर : निवेदनातून मांडल्या व्यथा
आधीच कोरोनाने व्यापार घटला असून, बँकांची कर्ज देणे थकली आहेत. कसेबसे नियम शिथिल झाल्यावर दुकाने उणीपुरी १९ दिवस सुरू झाली होती. की, लगेचच डेल्टाची भीती निर्माण झाली आहे. या भीतीशी आम्ही सहमत आहोत. परंतु त्यावर संपूर्ण व्यापार बंद ठेवणे ,हा पर्याय नसल्याची माहिती व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री टोपे यांची शनिवारी भेट घेऊन केली. यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विनीत साहनी, महासचिव संजय दाड, कार्यकारी सचिव श्याम लोया, कार्याध्यक्ष अर्जुन गेही, सुभाष देवीदान, डॉ. संजय रूईखेडकर, इश्वर बिलोरे, विनोद कुमावत, विजय बगडिया, दिलीप शाह, बंकट खंडेलवाल, नंदू जांगडे आदींची उपस्थिती होती.
किरणा दुकानांवरही कारवाई
पालिका आणि पोलीस हे गेल्या पंधरा दिवसांपासून हेतूपुरस्सर त्रास देत आहेत. पाच हजार रुपयांचा दंड आकारून दुकाने सील करत असल्याने आणखी अडचण निर्माण झाली असल्याची बाब टोपे यांच्या कानावर घालण्यात आली. विशेष म्हणजे किराणा दुकानांवरही बंद ठेवण्याच्या सूचना पोलिसांकडून दिल्या जात असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.