महसूलची कडक कारवाई! अंबडमध्ये तब्बल ५३ वाळू माफियांवर गुन्हे, मालमत्तावर बोजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 19:45 IST2025-05-07T19:45:13+5:302025-05-07T19:45:37+5:30

अंबड महसूल प्रशासनाचा दणका

Strict action by revenue! Crimes against 53 sand mafias in Ambad, encumbrance on property | महसूलची कडक कारवाई! अंबडमध्ये तब्बल ५३ वाळू माफियांवर गुन्हे, मालमत्तावर बोजा

महसूलची कडक कारवाई! अंबडमध्ये तब्बल ५३ वाळू माफियांवर गुन्हे, मालमत्तावर बोजा

अंबड/वडीगोद्री : तालुक्यातील आपेगाव, शहागड, गोंदी येथील वाळू माफियांच्या विरोधात महसूल विभागाने कडक कारवाई केली आहे. अवैधरित्या गौण खनिज उत्खनन करणाऱ्या तब्बल ५३ वाळू माफियांवर गुन्हे दाखल करण्याचे आणि त्यांच्या मालमत्तावर बोजा टाकण्याचे आदेश तहसीलदार विजय चव्हाण यांनी दिले आहेत. 

जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, अप्पर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार यांच्या मार्गदर्शना खाली अंबड तालुक्यातील गोंदी, शहागड, आपेगाव या ठिकाणी अवैधरित्या गौण खनिज उत्खनन व चोरी करणाऱ्या ट्रॅक्टर लोडर यांच्यावर गुन्हे नोंद करण्यात येणार आहेत. यात आपेगाव ६, गोंदी १६, शहागड ३१ अशा एकूण ५३ वाळू माफियांवर गुन्हे नोंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच यांच्या चलअचल संपत्तीचा शोध घेऊन त्यावर बोजे टाकण्यात येणार आहेत. याबाबत तहसीलदार विजय चव्हाण यांनी स्वतः गावात जाऊन गोपनीय चौकशी केली आहे. वाळू उत्खनन होत असलेल्या नदीपात्रात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ नुसार संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे, अशी माहिती तहसीलदार विजय चव्हाण यांनी दिली आहे.

वाळू पट्ट्यात संचारबंदी
नदीपत्रातील वाळूपट्ट्यात संचारबंदीचा भंग होत असल्याबाबत देखील कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. 
- विजय चव्हाण, तहसीलदार अंबड

६५० ब्रास अवैध वाळू उपसा
अंबड तालुक्यातील आपेगाव गोदावरी नदीपात्रातून ३०० ब्रास, शहागड गोदावरी नदी पात्रातून जुन्या पुलाच्या बाजूला व महादेव मंदिरा लगतच्या ठिकाणाहून २०० ब्रास, तर गोंदी येथील सिद्धेश्वर पॉईंट येथील गोदावरी नदी पात्रातून १५० ब्रास अशी एकूण ६५० वाळूचा अवैध उपसा करण्यात आला आहे. 

या ५३ वाळू माफियांवर होणार गुन्हे दाखल : 
- महेशबाळासाहेब चौधरी, मंगेश माऊली चौधरी, अक्षय महादेव चौधरी, मुकुंद भरतराव चौधरी, कैलास पंढरीनाथ चौधरी, गजेंद्र देविदास चौधरी सर्व रा.आपेगाव ता. अंबड
- किशोर प्रभ्र खराद, विकास सुरेश खराद, मनोज सुरेश खराद, कचरु उत्तम खराद, ऋषिकेश विश्वबंर खराद डिंगाबर रघुनाथ शिंदे, अक्षय राजाभाऊ बाणईत, सोपान दिनकर खराद, राहुल बळीराम खराद, बाबा अर्जुनराव कुलकर, अदिनाथ दत्ता शिंदे, स्पप्नील तात्या मरकड, अवधुत दत्ता मिटकुल, गणेश कैलास मरकड, महेद्र कचरु खरात, अण्णासाहेब संजय सोळुके सर्व रा.गोदी ता. अंबड
- विजय बन्सी  पूर्भे, शाहरुख मकबूल शहा, सय्यद सोहेच रफोव्याहीन, संदिप रमेश धोत्रे,अविनाश बबन हारेर
जुनेद चॉदमिया तांबोळी, योगेश मोहन परदेशी,इरफान तांबोळी, अमेर गुलाब बागवान, इद्रीस रहिम शहा,दत्तात्रय प्रल्हाद ढगे,इमतियाज बाबू मनियार,नितीन मोहन परदेशी, अयाज हनिफ बागवान,चंद्रकांत सर्जेराव लव्हाळे,सचिन भैय्यालाल परदेशी,मुक्तार अकबर शहा, नवीद चाँदमियों तांबोळी, गणेश अप्पा कूकरे, समिव्येद्दीन छोटूमिया शेख,अजय प्रकाश निकाळजे, भैय्या मधुकर येटाळे, गणेश शांतीलाल उमरे,
संजय लक्ष्मण रोटेवाड, लखन प्रेमंचद परदेशी,प्रदिप रमेश धोत्रे,अजय हरीचंद्र परदेशी, योगेश जगनन्नाथ उमरे  बाबासाहेब आसाराम येटाळे,इमरान महेबुब खान पठाण संजय सुभाष उमरे सर्व रा. शहागड ता. अंबड

Web Title: Strict action by revenue! Crimes against 53 sand mafias in Ambad, encumbrance on property

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.