शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

मतदार दिनातून लोकशाही बळकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2020 00:54 IST

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात शनिवारी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : भारत हा लोकशाही प्रधान देश असून, या देशात निवडणुकांच्या माध्यमातून आपण लोकशाही अधिक बळकट करतो. तरुणांमध्ये लोकशाहीचे बिजारोपण करण्यासाठी राष्ट्रीय मतदार दिवस महत्वाची भूमिका बजावतो, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी रवींद्र परळीकर यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात शनिवारी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंजली कानडे, जिल्हा पुरवठा अधिकारी बसैय्ये, उपविभागीय अधिकारी केशव नेटके, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, गटशिक्षणधिकारी विठ्ठल जायभाये, पोलीस निरीक्षक निशिकांत पवार, पोलीस उपनिरीक्षक बालाजी देवडे यांची उपस्थिती होती.परळीकर म्हणाले, शिक्षकांनी शाळेत विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची रुजवणूक शालेय वयात केल्यास निश्चितच आगामी काळात लोकशाही अधिक बळकट होईल व यातून मतदानाची टक्केवारी वाढेल. यावेळी जिल्ह्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पर्यवेक्षक, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, डाटा एंट्री आॅपरेटर, निबंध, चित्रकला, रांगोळी स्पर्धेत बक्षिस प्राप्त विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. उपस्थितांना राष्ट्रीय मतदार दिनाची प्रतिज्ञा देण्यात आली.प्रारंभी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंजली कानडे यांनी गांधी चमन येथून हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. या रॅलीमध्ये शालेय विद्यार्थी, विद्यार्थिंनी, पोलीस बँड पथक, एस.आर.पी.एफ.चे जवान आदींनी सहभाग नोंदविला.

टॅग्स :democracyलोकशाहीVotingमतदानSocialसामाजिक