संतप्त नागरिकांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 00:43 IST2019-05-12T00:43:18+5:302019-05-12T00:43:23+5:30

गांधीनगर, वाल्मीकनगर, रामनगरमध्ये पाणी टंचाई असल्याने संतप्त नागरिकांनी शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन करुन पाणी समस्या सोडविण्याची मागणी केली.

Stop the way of angry citizens | संतप्त नागरिकांचा रास्ता रोको

संतप्त नागरिकांचा रास्ता रोको

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांना वीस ते पंचवीस दिवसापासून पाणी मिळण्यास अडचणी येत आहे. गांधीनगर, वाल्मीकनगर, रामनगरमध्ये पाणी टंचाई असल्याने संतप्त नागरिकांनी शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन करुन पाणी समस्या सोडविण्याची मागणी केली.
शहराला जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा होतो. मात्र शहर येणाऱ्या पाण्याची मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात येते. परिणामी, शहराला पुरेशा प्रमाणात पाणी वितरित करण्यात अडचणी येत आहेत. मात्र शहरात आलेले पाण्याचे योग्य नियोजन करण्यात पालिका प्रशासन कमी पडत असल्याची ओरड नागरिकांतून होत आहे. यावेळी नागरिकांची मोठी उपस्थिती होती.

Web Title: Stop the way of angry citizens