रस्त्यासाठी छावा संघटनेचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 00:50 IST2018-06-12T00:50:43+5:302018-06-12T00:50:43+5:30
गेवराई बाजार ते ढासला रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करण्याच्या मागणीसाठी छावा संघटना व ग्रामस्थांच्या वतीने सोमवारी जालना-औरंगाबाद महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

रस्त्यासाठी छावा संघटनेचा रास्ता रोको
लोकमत न्यूज नेटवर्क
बदनापूर : तालुक्यातील गेवराई बाजार ते ढासला रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करण्याच्या मागणीसाठी छावा संघटना व ग्रामस्थांच्या वतीने सोमवारी जालना-औरंगाबाद महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
तालुक्याच्या दुर्गम भागाला जोडणारा गेवराई बाजार ते ढासला हा महत्वाचा रस्ता असून, या रस्त्यावरून जालन्यासह औरंगाबाद जिल्हयातील काही गावांची वाहतूक सुरू असते. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या डांबरीकरणाकडे संबंधित विभागांचे दुर्लक्ष असून, यामुळे या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्याच्या दुरवस्थेबाबत संबंधित अधिकाऱ्यांना अनेक वेळा निवेदन देण्यात आले. परंतु अधिका-यांनी त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे सोमवारी छावा संघटना व ग्रामस्थांच्या वतीने जालना-औरंगाबाद महामार्गावर रास्ता रोको करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार शिंदे यांना निवेदन देण्यात आले. या रस्त्याचे डांबरीकरण लवकर करण्यात यावे, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी छावाचे जिल्हा प्रभारी अशोक नाईक आदींसह कार्यकर्त्यांचा समावेश होता.