शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत चोरलेले वाहन जालना शहरात सापडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 23:22 IST

मुंबई येथे चोरलेल्या हायवा वाहनाचे पार्ट काढून भंगारात विक्री करण्याचा चोरट्याचा प्रयत्न कदीम पोलिसांनी उधळून लावला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मुंबई येथे चोरलेल्या हायवा वाहनाचे पार्ट काढून भंगारात विक्री करण्याचा चोरट्याचा प्रयत्न कदीम पोलिसांनी उधळून लावला. मुंबईतून वाहन चोरणाऱ्या चोरट्यासह वाहन ताब्यात घेतले. ही कारवाई रविवारी सायंकाळी शहरातील दु:खीनगर भागात करण्यात आली.कदीम पोलीस ठाण्याचे पोनि देविदास शेळके व त्यांचे सहकारी २३ फेब्रुवारी रोजी गस्तीवर होते. शहरातील दु:खीनगर भागातील शेतात एक व्यक्ती वाहनाचे पार्ट तोडत असल्याची माहिती पोनि शेळके यांना मिळाली. या माहितीवरून पथकाने कारवाई करून शफिक पठाण मनसूर पठाण (रा. संजय नगर, जुना जालना) याला ताब्यात घेतले. त्याने पंधरा दिवसांपूर्वी ते वाहन मुंबई येथून चोरून आणल्याचे सांगितले. पठाणसह वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि देविदास शेळके, पोना कृष्णा चव्हाण, गणेश जाधव, कर्मचारी रमेश काळे, आशा मगरे यांच्या पथकाने केली.वाहन ताब्यात घेतल्यानंतर पोनि देविदास शेळके यांनी मुंबई आयुक्तालयाशी संपर्क साधून वाहनाची माहिती दिली. त्यावेळी त्या वाहनाची (क्र. एम.एच.४६- एफ. ५१६२) २ फेब्रुवारी रोजी चोरी झाल्याचे समोर आले. या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वाहनाची माहिती मिळताच तळोजा ठाण्याचे पथक आरोपीला ताब्यात घेण्यासाठी निघाले आहे.

टॅग्स :theftचोरीCrime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई