घरी राहून न्याय मिळणार नाही, उद्याच्या मेळाव्यासाठी सर्वांनी येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 03:32 PM2023-10-13T15:32:10+5:302023-10-13T15:33:13+5:30

मराठ्यांनी इतिहास रचलाय हा कार्यक्रम देखील ऐतिहासिक होईल

Staying at home will not bring justice, Manoj Jarange appeals to everyone to come for tomorrow's meeting | घरी राहून न्याय मिळणार नाही, उद्याच्या मेळाव्यासाठी सर्वांनी येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन

घरी राहून न्याय मिळणार नाही, उद्याच्या मेळाव्यासाठी सर्वांनी येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन

जालना: कितीही गर्दी असली तरी मराठा समाज घरी थांबणार नाही. तो कार्यक्रमाच्या ठिकाणी येणारच, घरी राहून न्याय मिळणार नाही त्यामुळे मेळाव्यासाठी सर्वांनी यायचे आहे, असे आवाहन मनोज जरांगे यांनी आज पत्रकार परिषदेतून केले. अंतरवली सराटीमध्ये उद्या 12 वाजता होणाऱ्या मराठा समाजाच्या मेळाव्याची सर्व व्यवस्था पूर्ण झालीय आहे. त्याठिकाणी 5 हजारांहून अधिक स्वयंसेवक सेवा देणार आहेत, अशी माहिती देखील जरांगे यांनी दिली. 

मनोज जरांगे पुढे बोलताना म्हणाले, सर्वाना विनंती आहे येताना डोक्यावर रुमाल, टोपी घालून यावं, सोबत पाण्याची बॉटल जेवणाचा डब्बा देखील घेऊन यावं. काही गैरसोय झाली तर नाराज होऊ नका. सर्वांनी वाहन हळू चालवावीत. संपूर्ण महाराष्ट्रातून बांधव येणार आहेत. गाडीला झेंडा , स्टिकर लावा आपली गाडी कुठेच अडवली जाणार नाही. सर्वांनी पोलिसांना सहकार्य करावे, शांततेत यायचं, शांततेत जायचं, अशी आवाहन देखील जरांगे यांनी केली. 

मेळाव्यासाठी येणाऱ्यांसाठी आजूबाजूच्या गावांनी पाण्याची जेवणाची,सोय करावी. येणाऱ्यांनी गाड्यांमध्ये आजच इंधन भरून ठेवा, पंपावरील गर्दी टाळा. ही सभा शांततेत पार पडण्यासाठी सहकार्य करावे.सर्वजण शिस्तीचे पालन करतील, कोणीही आरडाओरड करायचा नाही. येथून पुढे मराठा समाजाला डाग लागू नये, आपल्या पायाखाली मुंगी सुद्धा मरु नये. मराठ्यांनी इतिहास रचलाय हा कार्यक्रम देखील ऐतिहासिक होईल,असा विश्वास जरांगे यांनी व्यक्त केला.

फक्त 31 गावातील ग्रामस्थांनी केला खर्च
आमच्या 123 गावांनी राज्यातील संपूर्ण समाजाची सेवा करण्याचं ठरवलं आहे. आमचे पैसे घाम गाळून ,पिकाच्या उत्पन्नातून आलेले आहेत. याव्यतिरिक्त कोणी 500 रुपये 123 गाव सोडून मागितले असतील तर दाखवून द्या. 123 पैकी फक्त 31 गावांतील ग्रामस्थांनी खर्च केला असून उर्वरित गावांतील पैशांची गरज पडली नाही.

मराठा समाजाने नेते मोठे केले
ज्या घटनेच्या पदावर माणूस बसलेला आहे,यांच्याकडून मराठा द्वेष दिसतोय, मराठा समाजाने त्यानांही मोठं केलं, याची जाणीव त्यांनी ठेवावी, त्यांची भाषाच वेगळी ते येवल्याचे साहेब पण तसेच. धनगर बांधवांना देखील फसवलं त्यांना 50 दिवस दिलेत. आम्ही दोघे-(मराठा आणि धनगर) एक आल्यावर सरकारचे कसे होईल. आम्ही दोघांनी मनावर घेतले तर तुम्ही काय करणार? मला धनगर समाजाचे आमंत्रण मिळाले असून मी जाईल.

Web Title: Staying at home will not bring justice, Manoj Jarange appeals to everyone to come for tomorrow's meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.