शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
3
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
4
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
5
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
6
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
7
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
8
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
9
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
10
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
11
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
12
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
13
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
14
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
15
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
16
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
17
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
18
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
19
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
20
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
Daily Top 2Weekly Top 5

दारूच्या नशेत गुप्तधनाचा नाद, पत्नीचाच नरबळी देण्याचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:32 IST

टेंभुर्णी (जि. जालना) : दारूच्या नशेत घरची काही शेती विकली आणि गुप्तधन शोधण्याचा नाद लागला. गुप्तधनाच्या लालसेत चक्क स्मशानभूमी ...

टेंभुर्णी (जि. जालना) : दारूच्या नशेत घरची काही शेती विकली आणि गुप्तधन शोधण्याचा नाद लागला. गुप्तधनाच्या लालसेत चक्क स्मशानभूमी पालथी घातली आणि घरातील गुप्तधन शोधण्याच्या प्रयत्नात पतीने पत्नीचाच नरबळी देण्याचा घट घातल्याचा प्रकार डोणगाव (ता. जाफराबाद, जि. जालना) येथे गुरुवारी उघडकीस आला. टेंभुर्णी पोलिसांनी या प्रकरणात पतीसह मांत्रिक महिला व एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

सीमा संतोष पिंपळे (रा. डोणगाव, ता. जाफराबाद, जि. जालना) असे पीडित महिलेचे नाव आहे. डोणगाव येथील सीमा पिंपळे यांचा पती संतोष बाबूलाल पिंपळे याला दारूचे व्यसन लागले होते. दारूच्या व्यसनात संतोष पिंपळे याने घरची काही शेती विकली. दारूच्या नशेत असणाऱ्या संतोषला गुप्तधन शोधण्याचा नाद लागला आणि तो रात्री-अपरात्री गावा व परिसरातील गढी, स्मशानभूमीमध्ये फिरू लागला. सीमा पिंपळे या २२ सप्टेंबर रोजी रात्री मुलांसह घरी होत्या. त्यावेळी संतोष पिंपळे, गावातील जीवन पिंपळे व एक मांत्रिक महिला घरी आली आणि घरातील लाकडी खांबाला काहीतरी धरबंधन करून निघून गेली. त्यानंतर रात्रीच्या सुमारास संतोष पिंपळे याने गुप्तधनासाठी बळी द्यायचा म्हणून पत्नी सीमा पिंपळे यांना हळदी-कुंकू, अगरबत्ती लावण्याचा प्रयत्न केला. विरोध केल्यानंतर संतोषने त्यांना मारहाण केली. तुझा बळी देऊन गुप्तधन काढतो, असे संतोष म्हणताच त्यांनी आरडाओरड केली. त्यानंतर त्यांचा मुलगा, शेजारील नागरिकांनी धाव घेऊन त्यांची सुटका केल्याची तक्रार सीमा पिंपळे यांनी २३ सप्टेंबर रोजी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार संतोष पिंपळे, जीवन भिका पिंपळे व मांत्रिक महिलेविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंध अधिनियम २०१३ कलम ३ (१) (ख), ४ सह कलम ३२३, ४०५, ५०६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलाच्या डोक्यावर, मुलीच्या पायावर ठेवला हात

मांत्रिक महिला सीमा पिंपळे यांच्या घरी आली आणि पलंगावर झोपलेल्या मुलांजवळ गेली. मुलगा विवेक याच्या डोक्यावर आणि मुलगी श्रावणी हिच्या पायावर हात ठेवला. त्यानंतर घराच्या खांबाला काहीतरी बांधले आणि गुप्तधनाचा उजेड पडला, मला सगळं दिसतंय असे सांगून ती निघून गेली. दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवल्याने त्यांचाही नरबळी देण्याची तयारी होती की काय, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. शिवाय त्या दृष्टीने तपास सुरू आहे.

दोघांना कोठडी

नरबळी देण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तत्काळ संतोष पिंपळे व जीवन पिंपळे या दोघांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तसेच मांत्रिक महिलेला रविवारी पोलिसांनी अटक केली आहे. तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

फोटो कॅप्शन

जाफराबाद तालुक्यातील डोणगाव येथील याच घरात महिलेचा नरबळी देण्याचा प्रयत्न झाला. (२६ जेएनपीएच ०१)

नरबळी देण्यासाठी पतीने घरी जमा केलेले साहित्य. (२६ जेएनपीएच ०२)