शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

दुग्धव्यवसायातून महिन्याकाठी साठ हजारांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:31 IST

वालसावंगी : घरी एक गुंठाही जमीन नसताना वालसावंगी येथील एका शेतमजूर कुटुंबाने दुग्धव्यवसायातून मासिक साठ हजारांचे उत्पन्न मिळविणे सुरू ...

वालसावंगी : घरी एक गुंठाही जमीन नसताना वालसावंगी येथील एका शेतमजूर कुटुंबाने दुग्धव्यवसायातून मासिक साठ हजारांचे उत्पन्न मिळविणे सुरू केले आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्य पशुपालन ते दूध विक्रीसाठी प्रयत्न करीत असून, शेती नसतानाही केवळ पशुपालनातून त्यांनी साधलेली आर्थिक उन्नती ही प्रेरणादायी आहे.

वालसावंगी येथील भूमिहीन शेतमजूर संजय तुकाराम खरात यांच्याकडे एक गुंठाही जमीन नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते मिळेल ते काम प्रारंभी करायचे. परंतु, स्वत: काहीतरी करायचे या प्रेरणेतून त्यांनी प्रारंभी शेळीपालनास सुरुवात केली. त्यातून चांगले उत्पन्न मिळत नसल्याने त्यांनी दोन गायी विकत आणल्या. गायी आणल्यानंतर प्रारंभी त्यांना दुधापासून उत्पन्न मिळू लागले. दुधापासून आर्थिक प्रगती होऊ लागल्याने पैसे संकलित करून त्यांनी आणखी पाच गायी विकत घेतल्या आहेत. सध्या ते दैनंदिन ८० लिटर दुधाची विक्री करतात. दुधाच्या व्यवसायातून महिनाकाठी एक लाखावर उलाढाल होते. त्यातील खर्च वजा जाता ५० ते ६० हजार रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळत आहे.

पशुपालनाचा व्यवसाय सुरू केल्यानंतर चाऱ्याचा प्रश्न गंभीर होता. चारा विकत घेण्यासह जनावरे पालनासाठीही कुटुंबातील सदस्य प्रयत्न करतात. त्या कामी त्यांना त्यांच्या मित्राने साथ दिली असून, त्यांच्या शेतात गोठा बांधून हे पशुपालन सुरू आहे. विशेष म्हणजे या जनावरांना दूरवरून पाणी आणून पाजले जाते. संकटांवर मात करून खरात कुटुंबाने घेतलेली उभारी इतरांसाठी प्रेरणादायी अशीच आहे.

शासकीय योजनांचा लाभ नाही

खरात यांनी पशुपालनाचा व्यवसाय सुरू करताना कोणत्याही शासकीय मदतीचा लाभ घेतलेला नाही. दैनंदिन दूध विक्रीतून जमा होणारे पैसे जमा करून व प्रसंगी बँकेचे लोण, उसनवारी करून त्यांनी पशुधन वाढिवले आहे. गायींना दैनंदिन सुग्रास ढेपसाठी अंदाजे पाचशे रुपये खर्च येतो. पशुपालनाचा व्यवसाय नियोजनपूर्वक केला तर आर्थिक लाभ मिळतो.

संजय खरात,

पशुपालक, वालसावंगी

फोटो