'सर, तुम्ही माझा संसार उद्ध्वस्त केला'; कथित ऑडिओ क्लिपमुळे पोलीस दलात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 12:29 IST2022-09-02T12:28:36+5:302022-09-02T12:29:08+5:30

आठ मिनिटे ५२ सेकंदांची ही ऑडिओ क्लिप आहे. यात एक अधिकारी व कर्मचाऱ्याचा संवाद आहे.

'Sir, you have ruined my world'; Alleged audio clip shocks police force of Jalana | 'सर, तुम्ही माझा संसार उद्ध्वस्त केला'; कथित ऑडिओ क्लिपमुळे पोलीस दलात खळबळ

'सर, तुम्ही माझा संसार उद्ध्वस्त केला'; कथित ऑडिओ क्लिपमुळे पोलीस दलात खळबळ

जालना : एका पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्याची कथित ऑडिओ क्लिप गुरुवारी व्हायरल झाल्याने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये प्रेम प्रकरणासंदर्भातील बाबी बोलण्यात आल्या आहेत. त्यामुळे दिवसभर या ऑडिओ क्लिपची चर्चा होती.

आठ मिनिटे ५२ सेकंदांची ही ऑडिओ क्लिप आहे. यात एक अधिकारी व कर्मचाऱ्याचा संवाद आहे. प्रेम प्रकरणासंदर्भात या दोघांमध्ये संवाद होत आहे. कर्मचारी रडत त्या अधिकाऱ्याने धोका दिल्याचे म्हणत आहे. मी तुमच्यावर एवढा विश्वास ठेवला. तुम्हाला मी गुरू मानले, तुम्ही माझा संसार उद्ध्वस्त केला आहे. तुम्ही मला समजून घेतले नाही, असे तो कर्मचारी अधिकाऱ्याला सांगतो. आज वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मला बोलावले होते. त्यांना मी काय बोलू, तुम्हीच सांगा सर, सर त्याने मला हाणले, तुम्ही त्या साहेबांना सांगून त्याच्यावर गुन्हा दाखल करायला लावा, असे तो कर्मचारी सांगतो. नंतर त्या कर्मचाऱ्याने फेसबूक लाईव्ह करून घडलेल्या बाबी सांगितल्या. 

दरम्यान, या ऑडिओ क्लिपमुळे पोलीस दलाची बदनामी होत आहे. याबाबत अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही, असा संवाद या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटले आहे.

Web Title: 'Sir, you have ruined my world'; Alleged audio clip shocks police force of Jalana