शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

जालना महापालिकेसाठी ठराव पाठवा, मंजुरी देतो : एकनाथ शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:30 IST

नगरविकास मंत्री शिंदे हे शुक्रवारी सायंकाळी जालन्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यलायात आढावा बैठक घेतली. या बैठकीस पालकमंत्री राजेश ...

नगरविकास मंत्री शिंदे हे शुक्रवारी सायंकाळी जालन्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यलायात आढावा बैठक घेतली. या बैठकीस पालकमंत्री राजेश टोपे, आ.बबनराव लोणीकर, माजी मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, महाज्योती संस्थेचे संचालक लक्ष्मण वडले. नगरविकास खात्याचे प्रधान सचिव महेश पाठक, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जालना पालिकेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांच्यासह जिल्ह्यातील तीनही पालिकेचे मुख्याधिकारी आणि नगरपंचायतचे अधिकारी हजर होते.

प्रारंभी शिंदे यांनी विविध योजनांचा आढावा घेऊन, ‘स्वच्छ शहर सुंदर शहरा’बाबत सीएआर निधीतून कामे करण्याचे सांगितले, तसेच शहरातील वाढते अतिक्रमण तातडीने हटवून ते पुन्हा वसणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी बिनवडे, मुख्याधिकारी नार्वेकर यांना दिले. वाढीव एफएसआय कशा पद्धतीने युनिफाईड डीसीआर प्रमाणे जनतेच्या हिताचा असल्याचे सांगितले. एकूणच मुंबई, पुणे येथील झोपडपट्टी विकासाचे सर्व निकष आता राज्यातील महापालिका आणि नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रातील झोपडपट्टी विकासाला लागू होतील असे शिंदे यांनी स्पष्ट केले. शहरातील मोती तलाव, घाणेवाडी तलावासह शहरातील मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहासाठी लागणारा निधी देण्याचे त्यांनी मान्य केले.

रस्त्याचे थर्ड पार्टी ऑडिट करणार

जालना शहरात २०१६ मध्ये शहरातील प्रमुख नऊ रस्त्यांची कामे चाळीस कोटी रूपये खर्च करून केली होती. परंतु चारच वर्षात या रस्त्यांची चाळणी झाली असून, शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे राज्य असल्याचे सांगण्यात आले. यावर शिंदे यांनी या रस्त्यांचे थर्ड पार्टीकडून ऑडिट करण्याचे सांगितले. तसेच अतिक्रमण होणार नाहीत याकडे लक्ष देण्यासह आहेत, ती अतिक्रमणे तातडीने हटविण्याच्या सूचना दिल्या.