'पैसे भेज, वरना फोटो व्हायरल करदुंगा'; बलात्कारानंतर तरुणीकडून लाखो रुपये उकळणारा अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2020 13:40 IST2020-11-28T12:18:14+5:302020-11-28T13:40:11+5:30
जालन्याच्या तरुणाने बलात्कारानंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन मुंबईच्या तरुणीस लुटले

'पैसे भेज, वरना फोटो व्हायरल करदुंगा'; बलात्कारानंतर तरुणीकडून लाखो रुपये उकळणारा अटकेत
जालना : इंस्टाग्रामवरील मैत्रीचे रूपांतर प्रेमात आणि नंतर शारीरिक संबंधात झाले. वर्षभराचा कालावधी उटल्यानंतर, 'तु मुझे पैसे भेज, नही तो फोटो रिश्तेदारोको फॉरवर्ड करदुंगा' अशा धमक्या देऊन जालन्याच्या तरूणाने मुंबईच्या तरूणीला १ लाख १९ हजार रूपयांना लुटल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. या प्रकरणी सदर बाजार पोलिसांनी नासेरखान अफसरखान (२७, हिंदनगर, नवीन मोंढा जालना) यास गुरूवारी ताब्यात घेतले.
नासेरखान हा जालना येथील जिंदल मार्केटमधील एका दुकानात आॅपरेटर म्हणून काम करतो. कार्यालयाचे वायफाय फ्रिमध्ये वापरण्यास मिळत असल्याने नासेर खान हा नेहमी सोशल मिडीयावर सक्रिय होता. मुंबई येथील एका तरुणीसोबत त्याची इंस्टाग्रामवर मैत्री झाली. या मैत्रीचे रूपांतर प्रेमात आणि नंतर शारीरिक संबंधात झाले. त्या तरूणीला जालना येथे बोलावून जिंदल मार्केटमधील एका दुकानात आणि रेल्वेस्टेशन परिसरातील एका लॉजवर नेऊन बलात्कार केला. त्यावेळीच नासेरखान याने त्या तरुणीचे अश्लील फोटो काढले होते. या फोटोच्या माध्यमातून तिला ब्लॅकमेल करून तिच्याकडून गुगलपेने १ लाख १९ हजार रूपये उकळले.
वारंवार पैशाची मागणी केल्यानंतर तरूणीने नासेरला ब्लॉकलिस्टमध्ये टाकले. त्यानंतर त्याने मुलीची आत्या व चुलता भावास अश्लील फोटो टाकले. याप्रकरणी ओशीवरा पोलीस ठाणे, पश्चिम मुंबई येथे सदर तरुणीने तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करून सदर बाजार पोलीस ठाण्यात वर्ग केला होता. त्यानंतर आरोपी नासेरखान अफसर खान याच्या सदर बाजार पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून, त्यास न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुुनावली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय देशमुख, सपोनि मंजुषा सानप, कर्मचारी समाधान तेलंग्रे, सुधीर वाघमारे, फुलचंद गव्हाणे, योगेश पठाडे यांनी केली.