शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

निवड झालेल्या लाभार्थांनी कागदपत्रे अपलोड करावीत- शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:22 IST

पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, शेतकऱ्यांनी संकेतस्थळावर शेतकरी योजना या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर वापरकर्ता आयडी या पर्यायावर ...

पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, शेतकऱ्यांनी संकेतस्थळावर शेतकरी योजना या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर वापरकर्ता आयडी या पर्यायावर क्लिक करावे. वापरकर्ता आयडीवर क्लिक केल्यानंतर वापरकर्ता आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करावे. प्रोफाइल स्थित पृष्ठावर मुख्य मेन्यूमधील मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर अप्लाइड घटकामध्ये छाननी अंतर्गत अर्ज या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपण केलेल्या सर्व अर्जांची स्थिती दिसेल. स्थितीमध्ये अपलोड डाॅक्युमेंट्स असा शेरा ज्या घटकासमोर असेल त्या घटकासाठी लॉटरीद्वारे आपली निवड झाली आहे, असे समजावे.

अप्लाइड घटक याच पृष्ठावरील मुख्य मेन्यूमधील कागदपत्रे अपलोड करा या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर वैयक्तिक कागदपत्रे या पर्यायावर क्लिक केल्यानंतर दर्शविलेल्या स्क्रीनवरील कागदपत्रे अपलोड करा या पर्यायावर क्लिक करावे. कागदपत्र अपलोड स्क्रीन दिसेल. त्यात नमूद केलेली विहित कागदपत्रे १५ केबी ते ५०० केबी या आकारमानातच अपलोड करून जतन करा या पर्यायावर क्लिक करावे.

लॉटरी निघून दोन महिन्यांपेक्षाही कालावधी झालेला असूनदेखील काही लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड केलेली नाहीत. असे अर्ज रद्द करण्याबाबत सूचना निर्गमित केल्या आहेत. या सूचनांच्या अधीन राहून अर्ज रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

वरील कागदपत्रांच्या छाननीनंतर पुढे करावयाच्या कार्यवाहीबाबत लाभार्थींना वेळोवेळी सूचना प्राप्त होतील. सदर कामासाठी आपण जवळच्या ई-सेवा केंद्राची मदत घेऊ शकता. तसेच यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी किंवा कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.