जुई धरणात चर खोदून पाण्याचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 01:06 IST2019-02-22T01:05:55+5:302019-02-22T01:06:14+5:30
भोकरदन तालुक्यातील दानापूर परिसरात सध्या तीव्र पाणीटंचाई आहे. पाण्याची सोय व्हावी यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने जुई धरणात चर मारुन पाण्याचा शोध सुरु केला आहे.

जुई धरणात चर खोदून पाण्याचा शोध
लोकमत न्यूज नेटवर्क
दानापूर: भोकरदन तालुक्यातील दानापूर परिसरात सध्या तीव्र पाणीटंचाई आहे. पाण्याची सोय व्हावी यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने जुई धरणात चर मारुन पाण्याचा शोध सुरु केला आहे.
धरणातून भोकरदन शहरासह २० गावांना पाणीपुरवठा केला जातो, परंतु हिवाळ्यातच धरण कोरडे पडल्यामुळे तीन महिन्यांपासून गावात पाणी टंचाई आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. पाणी टंचाई दुर्लक्ष होत असल्याने संतप्त महिलांनी काही दिवसापूर्वीच ग्रामपंचातय कार्यालयावर मोर्चा काढून रोष व्यक्त केला होता. यामुळे ग्रा.पं. कार्यालय खडबडून जागे झाले. पाणी टंचाई लक्षात घेऊन ग्रामपंचायतच्या वतीने धरणात खड्डे खोदून पाण्याचा शोध घेण्यात येत आहे दोन दिवसापासून या कामास प्रारंभ झाला असून या तीन फुटापर्यंत पाणी लागल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. धरणात इतर ठिकाणी चर मारुन पाण्याची समस्या सोडविण्यात येणार आहे.