शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
4
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
5
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
6
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
7
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
8
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
9
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
10
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
11
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
12
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
13
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
14
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
15
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
16
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
17
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
18
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
19
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
20
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
Daily Top 2Weekly Top 5

एक शाळा जेथे प्रत्येक विद्यार्थ्याच्या वाढदिवसाला सजतेय ताट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:28 IST

डावरगाव देवी शाळेत औक्षणाने साजरा होतो प्रत्येकाचा वाढदिवस टेंभुर्णी : एकीकडे मोठ्या घरच्या लेकरांचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा होत असताना ...

डावरगाव देवी शाळेत औक्षणाने साजरा होतो प्रत्येकाचा वाढदिवस

टेंभुर्णी : एकीकडे मोठ्या घरच्या लेकरांचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा होत असताना आपला वाढदिवसही कधी असा साजरा होईल का? असा विचार सहज गरीब लेकरांच्या मनात येऊन जातो. मात्र, लेकरांमधील श्रीमंत- गरीब ही दरी दूर करत शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा संकल्प जाफराबाद तालुक्यातील डावरगाव देवी या शाळेने केला आहे. या शाळेत प्रत्येक विद्यार्थ्याच्या वाढदिवसाला औक्षणाचे ताट सजविले जाते.

ज्याचा वाढदिवस आहे, त्या विद्यार्थ्याला मोठ्या सन्मानाने खुर्चीवर बसविले जाते. नंतर शाळेतील वाढदिवस समितीच्या विद्यार्थिनी औक्षणाचे सजविलेले ताट घेऊन त्या विद्यार्थ्याचे औक्षण करतात. त्यानंतर त्यांना शाळेतर्फे पुष्पगुच्छ भेट देऊन सर्व विद्यार्थी ‘हॅपी बर्थडे टू यू’चा गजर करून त्या विद्यार्थ्याला भरभरून शुभेच्छा देतात. काही मित्र- मैत्रिणी आपल्या मित्राच्या वाढदिवशी खाऊचेही वाटप करतात.

केवळ विद्यार्थ्यांचेच नाही तर प्रत्येक शिक्षक- शिक्षिकेचे वाढदिवसही या शाळेत तेवढ्याच उत्साहाने साजरे केले जातात. प्रत्येक शिक्षक आपल्या वाढदिवशी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट म्हणून देत असतात. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या या वाढदिवसातून विद्यार्थी- शिक्षक यांचे भावनिक नाते आणखी घट्ट होऊन विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणजे आपल्या कुटुंबातील व्यक्तीइतके जवळचे वाटायला लागतात. यामुळे शैक्षणिक वातावरण आनंददायी राहून विद्यार्थी हसत- खेळत शिक्षणात रममाण झाल्याचे दिसून येत आहे.

‘आमच्या शाळेत वाढदिवस चिमुकल्यांचा’ हा उपक्रम सातत्याने सुरू आहे. वाढदिवसाच्या दिवशी विद्यार्थी खूप आनंदित असतात. शाळेत त्यांचा वाढदिवस इतक्या उत्साहात साजरा होतो की, घरच्या वाढदिवसाची त्यांना आठवणही येत नाही. यामुळे विद्यार्थ्यांत बहीण- भावाचे भावनिक नाते आणखी घट्ट होते. त्याचा वाढदिवस साजरा झाला आता माझा कोण करणार, हा न्यूनगंड त्यांच्या मनात राहत नाही.

-रत्ना देशमुख, शिक्षिका, डावरगाव देवी.

फोटो

डावरगाव देवी शाळेत शुक्रवारी दोन मुलींचा वाढदिवस साजरा झाला. यावेळी या मुलींचे औक्षण करताना सहकारी मैत्रीण.