वाळूचा टिप्पर पकडला; साडेतीन लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 00:20 IST2019-08-23T00:20:01+5:302019-08-23T00:20:48+5:30
पूर्णा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी केलेल्या अचानक तपासणीत अवैध वाळू वाहतुकीचा टिप्पर पूर्णा पाटीजवळ सकाळी ११ वाजता तहसीलदारानी पकडला.

वाळूचा टिप्पर पकडला; साडेतीन लाखांचा दंड
तळणी : पूर्णा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी केलेल्या अचानक तपासणीत अवैध वाळू वाहतुकीचा टिप्पर पूर्णा पाटीजवळ सकाळी ११ वाजता तहसीलदारानी पकडला.
इंचा , टाकळखोपा व वाघाळा येथून अवैधरित्या ३ ते ४ ब्रास वाळू उत्खनन करुन वाहतूक करणारा टिप्पर एमएच. २८ बी. बी. ०४०७ हा इंचा ते पुर्णा पाटीदरम्यान गुरवारी मंठ्याच्या तहसीलदार सुमन मोरे यांनी अचानक वाळू वाहतूक तपासणीदरम्यान पकडला. या घटनेचा पंचनामा तलाठी नितीन चिचोले यांनी केला असून, पुढील कारवाईपर्यंत सदर टिप्पर तळणी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
साडेतीन लाखांचा दंड
या बाबत तहसीलदार सुमन मोरे यांना विचारले असता, सकाळी वाळू वाहतुकीचा वाहनांची तपासणी केली असता, विना रॉयल्टी ३ ब्रास वाळू वाहतूक करणारा टिप्पर पकडला असून संबंधित चालक तसेच मालकाकडून साडेतीन लाख रूपयांचा दंड वसूल करण्यात येणार असल्याचे मोरे यांनी सांगितले.