'समृद्धी'वर भीषण अपघात: जालन्याजवळ भरधाव ट्रकच्या धडकेत ७ कामगारांचा मृत्यू, ३ गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 18:48 IST2026-04-01T18:48:16+5:302026-04-01T18:48:45+5:30

काळीज पिळवटून टाकणारी घटना! समृद्धीवर सफाई ७ कामगारांचा जागीच अंत; भरधाव ट्रकने अक्षरशः चिरडलं!

samruddhi-Mahamarga-Accident: major-accident-on-samruddhi-Mahamarga-near-jalna-7-workers-killed-truck-collision-news | 'समृद्धी'वर भीषण अपघात: जालन्याजवळ भरधाव ट्रकच्या धडकेत ७ कामगारांचा मृत्यू, ३ गंभीर

'समृद्धी'वर भीषण अपघात: जालन्याजवळ भरधाव ट्रकच्या धडकेत ७ कामगारांचा मृत्यू, ३ गंभीर

जालना: समृद्धी महामार्गावर आज सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक अपघात घडला. मुंबईकडे जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने महामार्गाची सफाई करणाऱ्या महिला कामगारांच्या गाडीला जोराची धडक दिली. या भीषण धडकेत सात महिला कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत. जालना जिल्ह्याजवळील जामनेर-कडवंची शिवारात हा अपघात झाला असून, मृत आणि जखमी सर्व कामगार महिला असल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले.

भरधाव ट्रकने घेतला कामगारांचा बळी
मिळालेल्या माहितीनुसार, या महिला कामगार समृद्धी महामार्गावर सफाईचे काम करत. काम आटोपून कामगार महिला त्यांच्या गाडीत बसल्या. त्यांची गाडी महामार्गाच्या कडेला उभी असताना, मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने तिला भीषण धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, कामगारांच्या गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. यामध्ये सात महिला कामगारांना जागीच आपले प्राण गमवावे लागले, तर अन्य जखमींना उपचारासाठी तातडीने जालन्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मृत आणि जखमींमध्ये महिला कामगारांचा समावेश
समृद्धी महामार्ग अपघात जखमींची नावे:

प्रयागबाई बाबासाहेब वाघ (वय ३०),
कविता विठ्ठल चौधरी (वय ३५),
दिनेश रंगनाथ गायकवाड (वय ४२),
एक अनोळखी (वय ५०) ही जखमीची नावे असून त्यांच्यावर जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

समृद्धी महामार्ग अपघातील मृतांची नावे: 
अलकाबाई दादाराव आदमाने (वय ४५, रा. निधोना), 
लक्ष्मीबाई संतोष मदन (वय ३५, केळीगव्हाण), 
मीना परमेश्वर आदमाने (वय ४५, रा. निधोना), 
कांचनबाई प्रकाश आदमाने (वय ५०, रा. निधोना), 
ताराबाई गहेणाजी चौधरी (वय ६०, रा. केळीगव्हाण), 
कडूबाई रामदास मदन (वय ५५, रा. केळीगव्हाण), 
सुमनबाई कचरू आदमाने (वय ७०, रा. निधोना)

महिनाभरात दुसरी मोठी दुर्घटना; प्रशासन सुस्त?
विशेष म्हणजे, महिनाभरापूर्वी ६ मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाडजवळ अशाच एका भीषण अपघातात तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. तेव्हा रस्ता दुरुस्तीचे काम करून जेवण करत बसलेल्या कामगारांना एका ट्रकने चिरडले होते. एकाच महिन्याच्या अंतराने कामगारांचा बळी घेणारा हा दुसरा मोठा अपघात असल्याने, समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेबाबत आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

समृद्धीवर वारंवार अपघाताने चिंता 
अपघातामुळे महामार्गावरील मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. वारंवार होणाऱ्या या अपघातांमुळे समृद्धी महामार्गावरील 'ओव्हरस्पीड' आणि कामगारांच्या सुरक्षेसाठी असलेल्या नियमावलीच्या अंमलबजावणीवर नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहेत.

Web Title : समृद्धि एक्सप्रेसवे पर हादसा: जालना के पास ट्रक ने 7 मजदूरों को कुचला

Web Summary : जालना के पास समृद्धि एक्सप्रेसवे पर एक तेज रफ्तार ट्रक ने मजदूरों को टक्कर मार दी, जिसमें सात की मौत हो गई और तीन गंभीर रूप से घायल हो गए। एक महीने में श्रमिकों से जुड़ी यह दूसरी घातक दुर्घटना है, जिससे सुरक्षा को लेकर चिंता बढ़ गई है। पुलिस जांच कर रही है।

Web Title : Tragedy on Samruddhi Expressway: Truck Kills 7 Workers Near Jalna

Web Summary : A speeding truck struck workers on the Samruddhi Expressway near Jalna, killing seven and seriously injuring three. This is the second fatal accident involving workers in a month, raising safety concerns. Police are investigating.