शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्ग बनतोय 'मृत्यूचा मार्ग'! जालना जिल्ह्यात वर्षभरात ६ अपघातांत १४ जणांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 12:19 IST

सावधान! समृद्धीवर 'हायवे हिप्नोसिस'चा धोका; जालना जिल्ह्यातील अपघातांच्या आकडेवारीने प्रशासनाचे धाबे दणाणले.

जालना : वेगवान प्रवासासाठी ओळखला जाणारा हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गजालना जिल्ह्यासाठी गेल्या वर्षभरात मृत्यूचा सापळा ठरत आहे. १ एप्रिल ते ३१ मार्च या वर्षभराच्या कालावधीत जालना जिल्ह्याच्या हद्दीत झालेल्या ६ भीषण अपघातांमध्ये १४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. वाढत्या अपघातांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

वेग आणि डुलकीमुळे अपघातसमृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांच्या कारणांचा शोध घेतला असता, प्रामुख्याने मानवी चुका आणि तांत्रिक त्रुटी समोर येत आहेत. सरळ आणि गुळगुळीत रस्ता असल्याने वाहनचालकांना वेगाचा मोह आवरत नाही. मात्र, हाच अतिवेग अनेकदा नियंत्रणाबाहेर गेल्याने उलटल्याचे प्रमाण वाढले आहे.

अपघाताची 'पंचसूत्री' : का जाताहेत जीव?हायवे हिप्नोसिस: तासनतास एकसारख्या रस्त्यावर गाडी चालवल्याने चालकाची एकाग्रता भंग पावते आणि त्याला डुलकी लागते. यालाच तांत्रिक भाषेत 'हायवे हिप्नोसिस' म्हणतात. जालन्यातील अनेक अपघातांत हेच प्रमुख कारण असल्याचे निदर्शनास आले आहे.

टायरची 'एक्स्पायरी': सिमेंटच्या रस्त्यामुळे टायर गरम होऊन फुटण्याचे प्रमाण मोठे आहे. जुने टायर वेगाने धावताना उष्णता सहन करू शकत नाहीत आणि भीषण स्फोट होऊन गाडी पलटी होते.

लेन शिस्तीचा अभाव: महामार्गावर ठराविक लेनमधून गाडी चालवणे बंधनकारक असताना, अनेक चालक अचानक लेन बदलतात किंवा चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करतात.

वन्यप्राण्यांचा अडथळा: महामार्गाच्या कडेला असलेल्या जंगलातून वन्यप्राणी अचानक रस्त्यावर आल्याने चालकाचे नियंत्रण सुटून अपघात घडले आहेत.

घरी तुमची कोणीतरी वाट पाहतंयसमृद्धीवरून प्रवास करताना दर दोन तासांनी विश्रांती घ्यावी. टायरमध्ये नायट्रोजन हवेचा वापर करावा आणि वेगमर्यादेचे काटेकोर पालन करावे. समृद्धी महामार्गावर अपघात रोखण्यासाठी आम्ही गस्त वाढवली आहे. मात्र, चालकांनी स्वतःहून शिस्त पाळणे गरजेचे आहे. डुलकी येत असेल तर जबरदस्तीने गाडी चालवू नका, असे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागाने केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Samruddhi Mahamarg: 'Highway of Death' Claims 14 Lives in a Year

Web Summary : The Samruddhi Mahamarg in Jalna district has become a death trap, claiming 14 lives in six accidents within a year. Accidents are attributed to speeding, driver fatigue ('highway hypnosis'), tire bursts due to heat, lack of lane discipline, and wildlife crossings. Authorities urge drivers to take breaks and follow speed limits.
टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गJalanaजालनाAccidentअपघात