अडत दुकानातून ५७ हजार रुपयांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 00:59 IST2019-02-01T00:59:18+5:302019-02-01T00:59:36+5:30

मुख्य बाजारपेठेतील एका अडत दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ५७ हजार ४०० रूपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली.

Rs 57 thousand stolen from obstruction shop | अडत दुकानातून ५७ हजार रुपयांची चोरी

अडत दुकानातून ५७ हजार रुपयांची चोरी

लोकमत न्यूज नेटवर्क
बदनापूर : येथील गजबजलेल्या मुख्य बाजारपेठेतील एका अडत दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ५७ हजार ४०० रूपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली.
शहरातील शिवाजी महाराज चौकातील बाजारपेठेत रामस्वरूप गेलडा व नगरसेवक सत्यनारायण गेलडा यांचे बालाजी ट्रेडिंग या नावाने आडत दुकान आहे. बुधवारी सायंकाळी ते दुकान बंद करुन घरी निघून गेले होते. गुरुवारी सकाळी निखिल गेलडा हा दुकान उघडण्यासाठी गेला असता, त्यांना दुकानाच्या शटरचे कुलूप उघडे दिसले. दुकानात प्रवेश करुन पाहिले असता, या दुकानात ठेवलेल्या १० पैकी ९ तुरीच्या गोण्या चोरट्यांनी लंपास केल्याचे दिसले. यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी २३ हजारांच्या नऊ तुरीच्या गोण्या व कपाटात ठेवलेले नगदी ३४ हजार रुपये असा ५७ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.
याप्रकरणी रामस्वरूप जयकिसन गेलडा यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती बदनापूर ठाण्याचे अंमलदार पोहेकॉ सुपेकर यांनी दिली. दरम्यान, रामस्वरुप गेलडा यांच्या दुकानाच्या शेजारीजवळील दुकानही चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Rs 57 thousand stolen from obstruction shop