अंबड तालुक्यातील कुरण यथे एकाच रात्री तीन ठिकाणी दरोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 13:44 IST2018-09-08T13:42:54+5:302018-09-08T13:44:31+5:30

अंबड तालुक्यातील कुरण येथे शुक्रवार मध्यरात्री तीन ठिकाणी चोरट्यांनी सशस्त्र दरोड टाकला.

Robbery in Ambad taluka, three places at one night | अंबड तालुक्यातील कुरण यथे एकाच रात्री तीन ठिकाणी दरोडा

अंबड तालुक्यातील कुरण यथे एकाच रात्री तीन ठिकाणी दरोडा

शहागड (जालना ) :  अंबड तालुक्यातील कुरण येथे शुक्रवार मध्यरात्री तीन ठिकाणी चोरट्यांनी सशस्त्र दरोड टाकला. चोरट्यांनी ९ तोळे सोने आणि रोख ७० हजार रुपये असा जवळपास साडेतीन लाख रूपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. चोरट्यांच्या मारहाणीत सुंदर सोलनकर  गंभीर जखमी झाले असून त्यांना औरंगाबाद येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. 

शुक्रवारी मध्यरात्री कुरण येथे चोरट्यांनी धुमाकूळ घातला. चोरट्यांनी सुंदर सोलनकर घरातून रोख ५० हजार रूपये आणि ९ तोळे सोने, सुरेश बाजीराव सोनचाळे  २० हजार रोख लंपास करण्यात आली. यावेळी चोरट्यांनी सुंदर सोलनकर व भगवान सिताराम काळे यांना मारहाण केली. 

अंबड तालुक्यातील वडीगोद्री, शहागड, कुरण परिसरात गेल्या महिन्याभरात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. परतूर तालुक्यातील आष्टी येथे दोन दिवसापूर्विच पडलेल्या दरोड्यात साडेपाच लाख रूपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना ताजी आहे. याचा शोध अद्यापही पोलिसांना घेता आला नाही. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.

Web Title: Robbery in Ambad taluka, three places at one night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.