गोदापात्रातील अवैध वाळू तस्करीवर महसूल पथकाची धाड; सहा लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 17:16 IST2025-01-27T17:16:25+5:302025-01-27T17:16:49+5:30
अंबडमध्ये वाळू तस्करांविरोधात महसूलची जोरदार कारवाई; सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

गोदापात्रातील अवैध वाळू तस्करीवर महसूल पथकाची धाड; सहा लाखांचा मुद्देमाल जप्त
अंबड : अवैध वाळू उत्खनन विरोधात महसूल प्रशासनाने अंबड तालुक्यात जोरदार मोहीम उघडली आहे. आज, सोमवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास पाथरवाला हद्दीतील गोदावरी नदी पात्राजवळील बाबाची थडी या ठिकाणी महसूल पथकाने धाड टाकली. यावेळी पथकाने वाळूचे अवैध उत्खनन करणारे तीन ट्रॅक्टर केनीसह पकडले.
गोदावरी नदी पात्रामधून अवैध वाळू उत्खनन मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. यावर महसूल पथकाने जोरदार मोहीम उघडली आहे. आज, सकाळी महसूल पथकाने पाथरवाला हद्दीतील गोदावरी नदी पात्राजवळील बाबाची थडी येथे धाड टाकली. यावेळी तीन ट्रॅक्टर केनीच्या साह्याने वाळूचे उत्खनन करत असल्याचे दिसून आले. महसूलच्या पथकाने तीन ट्रॅक्टर केनीसह असा अंदाजे सहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. महसूलच्या पथकाकडून वारंवार होत असलेल्या कारवाईमुळे वाळू माफियांचे ढाबे दणाणले आहेत.
ही कारवाई सहाय्यक जिल्हा अधिकारी पुलकित सिंह व तहसीलदार विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार विवेक उढाण , नायब तहसीलदार महेंद्र गिरगे, मंडळ अधिकारी के. एस. एडके, मंडळ अधिकारी, संदीप नरुटे, मंडळ अधिकारी एस.बी. कारमपुरी, ग्राम महसूल अधिकारी स्वप्नील खरात, रमेश कांबळे, विनोद ठाकरे, पवन तुपकर, विकास डोळसे, महसूल सेवक अशोक शिंदे, मनोज उघडे, मनीष जिरेकर श्याम विभुते यांच्या पथकाने केली.