मुलगी देण्यास नकार; मामाचे डोके फोडले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 01:02 IST2018-12-18T01:01:45+5:302018-12-18T01:02:05+5:30

मामाने मुलगी देण्यास नकार दिल्याने भाच्याने दांडू मारुन मामावर हल्ला करून त्याचे डोके फोडले.

Refusal to give girl; Uncle"s head broke! | मुलगी देण्यास नकार; मामाचे डोके फोडले !

मुलगी देण्यास नकार; मामाचे डोके फोडले !

लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : मामाने मुलगी देण्यास नकार दिल्याने भाच्याने दांडू मारुन मामावर हल्ला करून त्याचे डोके फोडले. या प्रकरणी भाच्यासह दोघावर भोकरदन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टेंभुर्णी येथील गणेश वामन सोनसाळे हे शनिवारी बहीण कलाबाई त्र्यंबक काळे रा. बामखेडा ता. भोकरदन हिला भेटायला गेले असता भाचा नामदेव काळे, भागवत काळे आणि कारभारी बकाल हे माझ्या बहिणीच्या घरी बसलेले होते. त्यांनी माझ्याकडे मुलगी आहे. तिचे लग्न माझ्यासोबत लावून देण्याची मागणी केली. मी नकार देताच मला शिवी गाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. संगनमताने तिघांनी मला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी भाच्याने घरातील कुºहाड आणून त्या कुºहाडीचा दंडूका डोक्यात मारला त्यात डोक्याला जबर दुखापत होऊन त्याला सात टाके द्यावे लागले.प्राथमिक उपचार केल्यावर गणेश सोनसाळ यांना भोकरदन ग्रामीण रूग्णालयात नेले.
मात्र तरीही रक्तस्त्राव थांबत नसल्याने त्यांना जालन्यातील जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आल्याचे पोलीसांनी सांगितले.
या प्रकरणी फिर्यादी गणेश सोनसाळे यांच्या तक्रारीवरुन सोमवारी भाचा नामदेव काळे, कारभारी काळे तसेच भागवत काशीनाथ बकाल (सर्व रा. बामखेडा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास भोकरदन पोलीस ठाण्याचे बीट अंमलदार करीत आहेत.

Web Title: Refusal to give girl; Uncle"s head broke!