- दीपक ढोलेजालना : दुष्काळी भाग असलेल्या मराठवाड्यात मागील काही वर्षांपासून नकली नोटा गोरगरीब नागरिकांच्या माथी मारून कोट्यवधींची कमाई केली जात आहे. गेल्या अडीच महिन्यांत छत्रपती संभाजीनगरमध्ये २, नांदेड १, जालना १, हिंगोली १ आणि बीड जिल्ह्यांत बनावट नोटांप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगरातून पोलिसांनी नोटा तयार करणाऱ्या मशीनसह साहित्य जप्त केले. बीड, जालना, नांदेड येथून १२ लाख ३९ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.
खऱ्या २० हजारांतून १ लाखांच्या बनावट नोटा दिल्या जातात. छत्रपती संभाजीनगरात तर नोटांची छपाई केली जात असल्याचे कारवाईतून उघड झाले आहे. पोलिस कारवाया करतात, परंतु, पुन्हा काही दिवसांनी बनावट नोटा व्यवहारात आणल्या जात आहे. याबाबत छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे आयडी वीरेंद्र मिश्र यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
कशी ओळखाल बनावट नोटनोट प्रकाशात धरल्यावर, महात्मा गांधींचा वॉटरमार्क स्पष्ट दिसतो. हा वॉटरमार्क स्पष्ट आणि वेगवेगळ्या छटांमध्ये असतो. बनावट नोटांमध्ये तो जाडसर किंवा पुसट दिसू शकतो. नोटेच्या मध्यभागी एक पातळ हिरवा धागा असतो. तो काही ठिकाणी तुटक दिसतो. प्रकाशात पाहिल्यास तो एक अखंड धागा दिसतो आणि त्यावर भारत हिंदीमध्ये आणि "आरबीआय" असे इंग्लिशमध्ये लिहिलेले असते. ५०० रुपयांच्या नोटांमध्ये हा धागा तिरका धरल्यावर त्याचा रंग हिरव्यावरून निळा होतो. बनावट नोटांमध्ये हा धागा फक्त छापलेला असू शकतो.
काय काळजी घ्याल ?कोणतीही ५०० रुपयांची नोट घेताना, ती तपासून घ्या. जर तुम्हाला नोटेबद्दल शंका आली, तर ती घेऊ नका किंवा बँकेत जाऊन तपासून घ्या.
चालू वर्षांत झालेल्या कारवाया१) ३१ जानेवारीला डोका (ता. केज, जि. बीड) येथील माजी सरपंच व एका व्यापाऱ्यावर कारवाई करून ८ लाख ३७ हजार ८०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या.२) २ मार्चला छत्रपती संभाजीनगरात बनावट नोटांचे मशीन बेगमपुरा पोलिसांनी जप्त केले होते. याप्रकरणी नांदेडच्या दोघांवर गुन्हा दाखल केला.३) २७ फेब्रुवारीला १ लाखांच्या बदल्यात २.५० लाखांच्या बनावट नोटा देणाऱ्यांना हिंगोलीत पोलिसांनी पकडले होते.४) ८ फेब्रुवारीला अंबड पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेऊन ३ लाख ८३ हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या.५) १ मार्चला नाशिक पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरात बनावट नोटांचा छापखाना उद्ध्वस्त केला. यात संभाजीनगरातील चौघांची नावे समोर आली होती.६) ११ मार्चला माहूर (ता. नांदेड) येथील अल्पवयीन मुलाकडून १९,५०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. माहूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
आठवडी बाजार, यात्रेत बनावट नोटाएजंट हे नोटा आठवडी बाजार, यात्रा किंवा इतर गर्दीच्या ठिकाणी देतात. कारण लोक नोटा व्यवस्थित तपासून घेत नाही. अल्पशिक्षित लाेकांनादेखील बनावट नोटा दिल्या जातात, असे पोलिसांनी सांगितले.
Web Summary : Marathwada faces a surge in counterfeit currency, targeting vulnerable citizens at markets and festivals. Recent police actions uncovered printing operations and seized over ₹12 lakh in fake notes across multiple districts. Agents exploit crowded areas to circulate the fake currency.
Web Summary : मराठवाड़ा में नकली नोटों का प्रचलन बढ़ गया है, जो बाजारों और त्योहारों में कमजोर नागरिकों को लक्षित कर रहा है। हालिया पुलिस कार्रवाई में कई जिलों में प्रिंटिंग ऑपरेशन का पता चला और 12 लाख रुपये से अधिक के नकली नोट जब्त किए गए। एजेंट भीड़-भाड़ वाले इलाकों का फायदा उठाकर नकली नोटों का प्रसार करते हैं।