घरकुल फाईलींवरून दोन गटांत हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 01:10 IST2019-12-03T01:09:52+5:302019-12-03T01:10:11+5:30

नगरपंचायत कार्यालयामध्ये सोमवारी दुपारी घरकुलाच्या फाईलीवरून दोन गटात हाणामारी झाली.

Ranging from char files to two groups | घरकुल फाईलींवरून दोन गटांत हाणामारी

घरकुल फाईलींवरून दोन गटांत हाणामारी

लोकमत न्यूज नेटवर्क
बदनापूर : येथील नगरपंचायत कार्यालयामध्ये सोमवारी दुपारी घरकुलाच्या फाईलीवरून दोन गटात हाणामारी झाली. या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
बदनापूर येथील राष्ट्रवादीचे नगरसेवक फिरोजखान हस्तेखान पठाण व वार्ड क्र ५ च्या नगरसेविका यांचा मुलगा शेख समीर शेख चाँद या दोघांमध्ये घरकुलाच्या फाईली व योजना यावरून सोमवारी दुपारी नगर पंचायतीत वाद होऊन हाणामारी झाली. या प्रकरणात नगरसेवक फिरोजखान हस्तेखान पठाण यांनी तक्रार दिली आहे. पठाण हे पालिका कार्यालयात घरकुलाच्या फाईली दाखल करण्यासाठी गेले होते. त्यावेळी शेख याने त्यांच्या फाईल खोट्या असून, त्यात काही दम नाही, असे म्हणून शिवीगाळ केली. तसेच फायटर काढून डोक्याच्या पाठीमागे मारून दुखापत केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून शेख समीर शेख चाँद व अरबाज शेख सलीम (दोघे रा. बदनापूर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला़ तसेच शेख समीर शेख चाँद यांनीही तक्रार दिली आहे. शेख यांची आई नगरसेविका असून, ते गावातील लोकांचे घरकुलाचे पैसे भरण्याच्या कारणावरून नगर पालिकेच्या कार्यालयात गेले होते. तेथे आरोपींनी त्यांचे घरकुलाचे काम खोटे असून, ती स्कीम खोटी आहे, असे लोकांना पाहून त्याचे कडील पैसे भरू नका, म्हणून शिवीगाळ केली व खुर्चीने मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून फिरोजखान हस्तेखान पठाण व रहेमदखान हस्तेखान पठाण (दोघे रा. बदनापूर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला.

Web Title: Ranging from char files to two groups