रामनगर आठवडी बाजारात जनावरांची बेभाव विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 00:28 IST2018-11-13T00:28:09+5:302018-11-13T00:28:38+5:30
रामनगर येथे सोमवारी भरलेल्या जनावरांच्या आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणात जनावरे विक्रीस आली होती. मात्र ७० ते ८० हजाराच्या जोडीला ३५ हजारापर्यत भाव मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले

रामनगर आठवडी बाजारात जनावरांची बेभाव विक्री
लोकमत न्यूज नेटवर्क
उटवद : जालना तालुक्यातील उटवद, रामनगर परिसरात दुष्काळी परिस्थिती आहे. रामनगर येथे सोमवारी भरलेल्या जनावरांच्या आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणात जनावरे विक्रीस आली होती. मात्र ७० ते ८० हजाराच्या जोडीला ३५ हजारापर्यत भाव मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
परिसरात आधीच अल्पशा पावसामुळे जनावरांच्या चारा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. कारण नागरिकांनाच पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने जनावरासाठी पाणी कोठून आणणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. यामुळे परिसरातील जनावरांचा बाजार जनावरांनी गच्च गर्दी दिसून येत आहे. मात्र बाजारात व्यापा-यांनी बैलजोडीच्या किंमती पाडुन मागितल्याने पशुपालकांची मोठी गैरसोय झाली होती. परिसरांत हिवाळ्यातच चारा तसेच पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
यामुळे आठवडी बाजारात परिसरांतील पशुधनाची मोठ्या प्रमाणात बेभाव विक्री झाली आहे.
मात्र बाजाराता पाहिजे तशी गर्दी नव्हती .दरम्यान यावर्षी पाऊस नसल्याने जिल्ह्यासह तालुक्यात दुष्काळ पडल्याने मिळेल त्या भावात पशुधन विक्री करण्याचा सपाटा शेतक-यांनी लावला आहे.