रोहनवाडी येथील हातभट्टीचा अड्डा एडीएसकडून उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 00:19 IST2019-03-18T00:18:25+5:302019-03-18T00:19:02+5:30

रविवारी जालना तालुक्यातील रोहनवाडी एडीएसच्या पथकाने हातभट्टीचा अड्ड्यावर छापा मारुन उद्ध्वस्त केला.

Raid on wine stock | रोहनवाडी येथील हातभट्टीचा अड्डा एडीएसकडून उद्ध्वस्त

रोहनवाडी येथील हातभट्टीचा अड्डा एडीएसकडून उद्ध्वस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : लोकसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने आतापासूनच खबरदारी घेण्यात येत आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी दारुअड्ड्यांवर छापे मारुन ते उद्ध्वस्त करण्यात येत आहे.
रविवारी जालना तालुक्यातील रोहनवाडी एडीएसच्या पथकाने हातभट्टीचा अड्ड्यावर छापा मारुन उद्ध्वस्त केला.
या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात एका महिलेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, पोहवा. ज्ञानदेव नागरे, पोलीस कर्मचारी नंदू खंदारे, किरण चव्हाण, श्रीकुमार आडेप, छाया बुजाडे यांनी कामगिरी केली.

Web Title: Raid on wine stock