शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
4
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
5
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
6
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
7
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
8
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
9
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
10
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
11
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
12
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
13
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
14
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
15
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
20
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
Daily Top 2Weekly Top 5

जालना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंगचा प्रकार; ६० विद्यार्थ्यांची सिनिअरविरुद्ध तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 14:27 IST

ज्युनिअर्सचा छळ करणाऱ्या वरिष्ठांची खैर नाही! जालन्यात १३ जणांची उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन

जालना : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंगचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा छळ केल्याची तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन महाविद्यालय प्रशासनाने १३ सदस्यांची उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली असून, चौकशी सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या ६० विद्यार्थ्यांनी ‘अँटी रॅगिंग सेल’ कडे तक्रार केली होती. दुसऱ्या वर्षांच्या विद्यार्थ्यांनी नियमांचे उल्लंघन करून आपल्याला त्रास दिला, असे पीडित विद्यार्थ्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. या तक्रारीमुळे वैद्यकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. रॅगिंगची तक्रार प्राप्त होताच अधिष्ठाता डॉ. सईदा अफरोज यांनी तातडीने बैठक बोलावली. घटनेची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी १३ जणांची एक समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती सध्या संबंधित विद्यार्थी, प्रत्यक्षदर्शी आणि अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवत आहे.

लवकरच अहवाल येईलप्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांविरुद्ध रॅगिंगची तक्रार केली आहे. त्यानुसार आम्ही तातडीने १३ जणांची चौकशी समिती स्थापन केली असून, विद्यार्थ्यांची सखोल चौकशी केली जात आहे. चौकशीचा अहवाल लवकरच प्राप्त होईल आणि त्यानुसार पुढील पावले उचलली जातील.-डॉ. सईदा अफरोज, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जालना.

दोषींवर होणार कारवाईरॅगिंग प्रतिबंधक कायद्यानुसार जर तक्रारीत तथ्य आढळले तर संबंधित दोषी विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाणार आहे. तसेच त्यांच्यावर फौजदारी गुन्हासुद्धा दाखल होऊ शकतो. आता चौकशी समितीच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ragging Allegations at Jalna Medical College; Seniors Accused by Students

Web Summary : Jalna Medical College faces ragging allegations. Sixty students complained against seniors. A high-level inquiry is underway. Action will be taken if allegations are proven true.
टॅग्स :JalanaजालनाEducationशिक्षणCrime Newsगुन्हेगारी