घोषणाबाज सरकारला खाली खेचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 00:53 IST2018-04-08T00:53:18+5:302018-04-08T00:53:18+5:30
भाजपा सरकारने चार वर्षात सर्वसामान्य जनतेसह शेतकरी, बेरोजगार, व्यापाऱ्यांची फसवणूक केली आहे. या फसव्या आणि घोषणाबाज सरकारला खाली खेचण्यासाठी जनतेने कॉगे्रसच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी केले.

घोषणाबाज सरकारला खाली खेचा
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : भाजपा सरकारने चार वर्षात सर्वसामान्य जनतेसह शेतकरी, बेरोजगार, व्यापाऱ्यांची फसवणूक केली आहे. या फसव्या आणि घोषणाबाज सरकारला खाली खेचण्यासाठी जनतेने कॉगे्रसच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी केले.
पेट्रोल, डिझेलसह जीवनावश्यक वस्तुंच्या दरवाढी विरोधात शनिवारी शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया, जिल्हा कार्याध्यक्ष राजाभाऊ देशमुख, काँग्रेस कमिटीचे सदस्य भीमराव डोंगरे, नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल, माजी जिल्हाध्यक्ष आर. आर. खडके, ज्ञानेश्वर भांदरगे, प्रदेश सरचिटणीस कल्याण दळे, प्रदेश सचिव विजय कामड, सत्संग मुंढे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा विमल आगलावे, युवक कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. संजय खडके, अल्पसंख्याक सेलचे बदर चाऊस, अनुसूचित जाती आघाडीचे जिल्हाध्यक्ष दिनकर घेंवदे, प्रदेश काँग्रेसच्या सदस्य सुषमा पायगव्हाणे, गणेश राऊत, राजेंद्र राख, नवाब डांगे, अॅड. सय्यद तारेख यांनी या वेळी सरकारवर टीका केली. आंदोलनात शहर कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमूद, जालना तालुकाध्यक्ष वसंत जाधव, जिल्हा सरचिटणीस राम सावंत, आलमखान पठाण, महावीर ढक्का, पारसनंद, जीवन सले, संजय भगत, वाजेद खान, वैभव उगले, गोविंदप्रसाद बोराडे, अशोक नावकर, संतोष माधेवाले, शमीम कुरेशी, नगरसेवक नजीब लोहार, शेख शकील, विनोद रत्नपारखे, अरूण मगरे, संगीता पाजगे, इर्शाद कुरेशी, खाजा जमादार चंदा भांगडिया, सुमनबाई निर्मल, मंगलताई खांडेभराड, मथुराबाई सोळुके, शरद खडके, त्र्यंबक पाबळे, भाऊसाहेब सोळुके, जुमान चाऊस, अन्वर मिर्झा बेग, मोईस अन्सारी, शिवराज जाधव, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.