भाजप-सेना लोकसभा निवडणूक एकत्रित लढण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 00:54 IST2018-10-03T00:53:55+5:302018-10-03T00:54:47+5:30
लोकसभा व विधानसभा निवडणुका या वेगवेगळ्या होणार असून, शिवसेना-भाजप युती होईल असा अशावाद त्यांनी यावेळी बोलून दाखविला.

भाजप-सेना लोकसभा निवडणूक एकत्रित लढण्याची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : खरीप हंगामात नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात येणार असून नागरिकांना निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या निवारणा साठी सरकारकडून तात्काळ उपाययोजना करण्यात येत आहेत असे महसूलमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी भोकरदन येथे पत्रकारांशी चर्चा करतांना सांगितले.
येथील भाजपा प्रदेश अध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले की, आमच्या सरकारने दहा लाख शेतकऱ्यांचे प्रत्येकी दीड लाख रूपयांचे कर्ज माफ केले ेआहे. भोकरदन तालुक्याच्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन कामे सुरू केल्या जातील, खरीप पंचनामे व ज्या गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे त्या गावात पिण्याच्या पाण्यासाठीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. भोकरदन आणि जालना रस्ता हा उर्वरित चाळीस किमी.चे सिमेंटीकरण पुढील काळात तात्काळ करण्यात येणार आहे. राज्यात सध्या राष्ट्रीय व राज्य महामार्गांची मोठ्या प्रमाणावर कामे युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी बहुतांश ठिकाणी रस्तालगतचीच जमीन संपादित केली आहे.
राज्यात आगामी काळात लोकसभा व विधानसभा निवडणुका या वेगवेगळ्या होणार असून, शिवसेना-भाजप युती होईल असा अशावाद त्यांनी यावेळी बोलून दाखविला. यावेळी खा. रावसाहेब दानवे, आ. संतोष दानवे यांची उपस्थिती होती.