जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 01:04 IST2019-01-19T01:03:59+5:302019-01-19T01:04:33+5:30

जाफराबाद शहरातील बसस्थानकजवळील मुस्कान हॉटेल समोर सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर अपर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने शुक्रवारी छापा मारुन दोघांना ताब्यात घेतले

Police raid on gambling stand | जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

जालना : जाफराबाद शहरातील बसस्थानकजवळील मुस्कान हॉटेल समोर सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर अपर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने शुक्रवारी छापा मारुन दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जुगाराच्या साहित्यासह १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विष्णु शामराव लोखंडे (४०, रा. चैनपुरा जाफराबाद), अंकुश काळे (रा. सिल्लोड) असे आरोपींची नावे आहे.
जाफराबाद येथील बसस्थानकाजवळ जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षकांना मिळाली. या माहितीवरुन सदर ठिकाणी छापा मारुन दोघांना ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. सिताराम मेहेत्रे, कर्मचारी शेख रहीम, अंकुश राठोड, शेख रशीद, संजय गवळी यांनी केली.

Web Title: Police raid on gambling stand