अंबड येथे पोलीसांची जुगार अड्यावर धाड; दहा जणांना घेतले ताब्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 18:30 IST2018-09-13T18:28:39+5:302018-09-13T18:30:06+5:30

अंबड तालुक्यातील जामखेड येथे जालना पोलीस विशेष पथकाने जुगार अड्यावर टाकली.

Police raid on gamblers spot at Ambad; Ten people detained | अंबड येथे पोलीसांची जुगार अड्यावर धाड; दहा जणांना घेतले ताब्यात 

अंबड येथे पोलीसांची जुगार अड्यावर धाड; दहा जणांना घेतले ताब्यात 

अंबड (जालना ) : अंबड तालुक्यातील जामखेड येथे जालना पोलीस विशेष पथकाने धनगरगल्लीतील जुगार अड्यावर बुधवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास धाड टाकली. यावेळी पोलिसांनी दहा जणांना ताब्यात घेतले. 

जामखेड येथे जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलीसांना खबऱ्याकडून मिळाली होती. यावरून अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनखाली अंबड पोलीसांनी धनगरगल्ली येथे छापा टाकला. अड्ड्यावरून १ लाख १५ हजार ६०० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच परमेश्वर भोजने, सुखदेव वैद्य, राधाकिसन नेमाने, नाथाजी भोजने, अश्पाक देशमुख, कृष्णा तार्डे, धोडीराम भोजने यांच्यासह १० जणांना ताब्यात घेतले. पोउपनि. दीपक वाघ यांच्या फियार्दीवरुन अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Police raid on gamblers spot at Ambad; Ten people detained