पोलीस अधिकाऱ्याच्या घरी डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 00:18 IST2019-02-10T00:17:59+5:302019-02-10T00:18:20+5:30
पोलीस उपनिरीक्षकाच्या घरी चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे.

पोलीस अधिकाऱ्याच्या घरी डल्ला
जालना : येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाच्या घरी चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. जेईएस महाविद्यालय जवळ पोलीस क्वार्टर आहेत. पोलीस उपनिरीक्षक हे शुक्रवारी नेहमी प्रमाणे कामावर गेले होते. सकाळी ९ ते दुपारी ३ यावेळेत ही चोरी करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
गेल्या काही महिन्यांमध्ये चोºयांचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे चोरट्यांना ज्ञात असूनही, पोलीस अधिका-यांच्या निवासस्थानी हात मारण्याचे साहस चोरट्यांनी केल्याने पोलिसांसमोर ही चोरी उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. चोरट्यांनी या अधिका-याच्या घरातील कपाट तोडून त्यातील रोख रक्कम तसेच दागिने आणि घड्याळ लंपास केले. या प्रकरणी चितळवारकर यांनी सदरबाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
या चोरीची माहिती मिळाल्यावर वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चोरट्यांनी चितळवारकर यांच्या घराचा पाठीमागील भागाचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला होता. भरदिवसा हा प्रकार घडल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. श्वान पथक तसेच ठसे तज्ज्ञांनी देखील परिसरात भेट देऊन ठसे घेतल्याचे सांगण्यात आले.
चोरट्यांनी पोलीस वसाहतीतही चोरीची हिंमत केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.