जालन्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १५ लाखाचा मुद्देमाल जप्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 19:39 IST2019-03-08T19:38:56+5:302019-03-08T19:39:57+5:30

१५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आठ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

police on gambling place at Jalana; An amount of 15 lakhs was seized | जालन्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १५ लाखाचा मुद्देमाल जप्त 

जालन्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १५ लाखाचा मुद्देमाल जप्त 

जालना : जालना तालुक्यातील सामनगाव येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुरुवारी सायंकाळी छापा मारुन धाडसी कारवाई केली आहे. यात जुगार साहित्यासह १५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आठ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिस अधीक्षक एस. चैतन्य यांना खबऱ्या मार्फेत माहिती मिळाली की, जालना तालुक्यातील सामनगाव येथे काही जण जुगार खेळत आहे. त्यानंतर त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकास घटनास्थळी पाठवून सदरील अड्यावर छापा मारला. यावेळी आठ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, १५ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार अड्डा चालक आणि इतर सात जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली.  या कारवाईमुळे जुगार अड्डाचालकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

Web Title: police on gambling place at Jalana; An amount of 15 lakhs was seized